रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी ढोरपगांव येथे महादेवाला साकडे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी: गजानन तांगडे खामगांव
खामगांव तालुक्यातील ढोरपगाव येथे शेतकऱ्यांच्या रान हिरवं गार होऊ दे दाना दाना टिपू दे म्हणत अशी आर्त हाक मारून महादेवाला साकडे घालण्यात आले.
जुलै महिन्यानंतर ऑगस्ट महिना पूर्ण कोरडा गेल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे ढग घोघावत आहेत. यामुळे शेतकरी हतबळ झाला आहे.
यंदाच्या वर्षी चांगल्या प्रकारे वरून राजा बरसणार पीक पाणी चांगले होईल या आशाने शेतकऱ्यांनी खत बियाणांची जुळवा जुळव करून ठेवली आहे पाऊसाने दांडी मारल्याने शेतातील सोयाबीन पीक फुल अवस्थेत असताना सुकून गेले आणि काही शेंग भरणे अवस्थेत असताना शेंगा पाणी नसल्याने पोकळ राहिल्या.
आषाढी एकादशीपासून जवळपास 30ते 40दिवसांपासून पाऊस नसल्याने उर्वरित पिकेही सुकू लागली आहे. ऑगस्ट महिना पूर्ण कोरडा गेल्याने रुसलेल्या वरून राजाला प्रसन्न करण्यासाठी शिव भोले कावडधारी युवकांनी गावातील सिद्धगंगा नदीचे पाणी वाहून महादेवाला अर्पण करीत डफळ्या च्या तालावर गावात फिरवून चांगला पाऊस होऊ दे शेतकऱ्याचे रान हिरवगार होऊ दे दाना दाना टिपू दे अशी आर्त हाक देत महादेवाला साकडे घातले आहे.
यावेळी कावडधारी बाळू पाटील, ज्ञानेश्वर तळे, सोपानराव सावंत, ज्ञानेश्वर खोटाळे, धनंजय तांगडे, रोहित पाटील मुंढे, अमोल खेडकर, शिवाजी आटोळे, धनंजय खेडकर, अमोल सावंत, सुपेश तायडे, वामन भाऊ कोरडे, प्रफुल तांगडे, पुरषोत्तम खेडकर, दत्त सावंत, तसेच इतर शिवभोले कावडधारी आणि गावकरी मंडळी यांनी महादेवाला नदीचे पाणी अर्पण करून महादेवाला पाण्यासाठी साकडे घालण्यात आले.



