मुक्ताईनगरातील तरुण बेपत्ता; कुटुंबीयांकडून शोध सुरू

मुक्ताईनगर प्रतिनिधी : मुक्ताईनगर शहरातील आनंद ट्रेडर्ससमोरील परिसरात राहणारा संदीप अशोक शिंदे हा तरुण दि. २० ऑगस्ट २०२६ पासून घरातील कोणालाही काहीही न सांगता अचानक घरातून निघून गेला असून, अद्याप त्याचा कोणताही शोध लागलेला नाही.
संदीप शिंदे घरातून निघून गेल्यानंतर कुटुंबीयांनी आप्तस्वकीय, मित्रपरिवार तसेच परिसरात त्याचा कसून शोध घेतला. मात्र, अनेक ठिकाणी शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
याप्रकरणी संदीप यांचे चुलतभाऊ महेंद्र रामभाऊ शिंदे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अधिकृतपणे हरवल्याची तक्रार (मिसिंग रिपोर्ट) दाखल केली आहे.
संदीप अशोक शिंदे यांच्याबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा ते कुठे दिसून आल्यास त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.
संपर्क व्यक्ती : महेंद्र रामभाऊ शिंदे (चुलत भाऊ)
मोबाईल क्रमांक : ९९२३० २९५०६
कुटुंबीयांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संदीप शिंदे यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तातडीने संबंधित कुटुंबीयांना कळवून शोधकार्याला सहकार्य करावे.



