बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

चिडीमारांचा बंदोबस्त करा, अन्यथा महिलांना घेऊन रस्त्यावर उतरू!

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
तालुका चिखली: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

उपनगराध्यक्ष सौ. वैशालीताई खेडेकर यांचा पोलिसांना सज्जड इशारा; शाळा, कॉलेज व क्लासेस परिसरातील वाढत्या टवाळखोरीविरोधात निवेदन

चिखली : शहरातील शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी वर्गांच्या परिसरात विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या तसेच टवाळखोरी व दादागिरी करणाऱ्या युवकांचा बंदोबस्त करण्याची मागणी चिखली नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सौ. वैशालीताई कपिल खेडेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात जाऊन ठाणेदारांना निवेदन देत तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत काही युवक दुचाकींवरून शाळा परिसरात घोळका करून उभे राहतात. विद्यार्थिनी बाहेर पडताच त्यांच्या मागे दुचाकीने फिरणे, अश्लील शेरेबाजी करणे व छेडछाड करण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे खेडेकर यांनी निवेदनात नमूद केले. काही युवक विद्यार्थ्यांशी विनाकारण वाद घालून दादागिरी करीत असल्याचेही त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले.

विशेषतः सायंकाळी ५ ते ७ वाजण्याच्या सुमारास पारधी बाबा मंदिर परिसरातील शिकवणी वर्गांजवळ दुचाकींवरून फिरणाऱ्या टवाळखोर युवकांचा वावर वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी या परिसरात नियमित गस्त वाढवून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास महिलांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून या टवाळखोरांचा बंदोबस्त करू, असा सज्जड इशारा सौ. वैशालीताई खेडेकर यांनी दिला.

मुलींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
निवेदन देतेवेळी कपिल खेडेकर तसेच पोलीस उपनिरीक्षक लोखंडे उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button