बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

देऊळगाव राजा येथे जश्न-ए-ईद मिलादुन्नबी उत्साहात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा: :१२रबी-उल-अव्वलनिमित्त जश्न-ए-ईद मिलादुन्नबीच्या मुबारक पर्वानिमित्त देऊळगाव राजा शहरात बुधवार, २६ ऑगस्ट रोजी जुलूस-ए-मोहम्मदीचे आयोजन करण्यात आले. श्रद्धा, उत्साह आणि बंधुभावाच्या वातावरणात पार पडलेल्या या जुलूसमध्ये मुस्लिम समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

सकाळी सुमारे ८.३० वाजता तकिया हजरत, तकिया मदरसा मस्जिद परिसरातून जुलूस-ए-मोहम्मदीला सुरुवात झाली. बस्तान चौक, हुडा मस्जिद, दरगाह मस्जिद, जामा मस्जिद तसेच जाफ्राबाद
बेस मार्गे जुलूस दरगाह शरीफ मस्जिद परिसरात 1 वाजून 30 मिनिटांनी पोहोचला. याठिकाणी श्रद्धापूर्वक फातिहा-ख्वानी करण्यात आली.

जुलूसदरम्यान नात-ए-पाक आणि धार्मिक घोषणांनी परिसर भक्तिमय झाला. शहरातील विविध ठिकाणी नागरिकांकडून सहभागींसाठी पिण्याचे पाणी, बिस्किटे तसेच खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती. या सेवाभावी उपक्रमातून आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.

दरगाह मस्जिदसमोर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक वातावरणासोबतच उपस्थितांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. जुलूसमध्ये सहभागी नागरिकांनी शिस्त आणि शांतता राखत उत्सवात सहभाग नोंदविला.

जुलूस व कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या नियोजनामुळे जुलूस शांततेत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

१२ रबी-उल-अव्वलनिमित्त झालेल्या या आयोजनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धार्मिक उत्साहासोबतच एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा हा जुलूस ठरला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button