बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगावा येतील झुडिओ मॉल मध्ये खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीच्या खात्यातून 99 हजार 899 रुपयांची ऑनलाइन उचल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव दि,२५-८ ला शहरातील झुडिओ मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेल्या एका व्यक्तीच्या बँक खात्यातून त्यांच्या नकळत तब्बल 99 हजार 899 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मनोज गंगाधर खुंटे हे पत्नीसमवेत खरेदीसाठी झुडिओ मॉलमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांचा Oppo कंपनीचा मोबाईल अचानक गरम होऊन बंद पडला. सुमारे दहा मिनिटांनंतर मोबाईल पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यांनी खरेदी केलेल्या कपड्यांचे ऑनलाइन पेमेंट करण्याम फोनपेचा वापर करण्याचा प्रयत्न केला.
याचदरम्यान त्यांच्या लक्षात आले की, सायंकाळी 5 वाजून 14 मिनिटांनी त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून फोनपेच्या माध्यमातून 99,899 रुपये अनोळखी खात्यावर ट्रान्सफर झाले आहेत. आपण कोणतेही व्यवहार केले नसतानाही खात्यातून एवढी मोठी रक्कम गेल्याचे समोर आल्याने तक्रारदारांना धक्का बसला.
मोबाईलमध्ये संशयास्पद हालचाल झाल्यानंतर अज्ञात व्यक्तीने मोबाईल किंवा डिजिटल खात्याचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी अप क्रमांक 542/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 318 (4) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील 66 (C), 66 (D) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, ऑनलाइन व्यवहार नेमका कोणत्या खात्यावर झाला, त्यामागे कोण आहे आणि मोबाईलचा गैरवापर कशा प्रकारे करण्यात आला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
मोबाईल अचानक बंद पडणे आणि त्यानंतर काही मिनियां खात्यातून मोठी रक्कम परस्पर ट्रान्सफर होणे, या प्रका डिजिटल व्यवहार करणाऱ्या नागरिकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button