बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पळशी झाशी येथील कंत्राटदारचे घर फोडून तब्बल साडे सहा लाखाची चोरी करून अज्ञात चोर लंपास….

संगीता उमाळे
दि.२३/८२०२६.
पळशी झाशी: संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी हे गाव तामगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे.
येथे १९ ऑगस्ट मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप कोंडी. कडी तोडून घरातील तब्बल साडेसहा लाख ४४. हजार ८०० रुपये लंपास केल्याची घटना २० ऑगस्ट रोजी उघडी आले.
अज्ञात चोरट्यांनी घरातील दोन लोखंडी आलमारीचे लोकर फोडून १९१ ग्रॅम सोन्याचे दागिने.२५० ग्रॅम चांदीचे दागिने. आणि एक लाख रुपये रोकड असा लाखोंचा माल लंपास केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कैलास श्रीकृष्ण मारोडे वय ४६.)रा. पळशी झाशी.ता. संग्रामपूर. हे काही कामानिमित्ताने घराबाहेर असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराची कडी. कोंडा तोडून घरात शिरले. नंतर दोन लोखंडी आलमारीचे लॉकर फोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाले. चोरी गेलेल्या सोन्याचांदीची किंमत अंदाजे साडेसहा लाख एवढे आहे.
घरफोडी प्रकरणामुळे सर्व पळशी झाशी. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
तसेच पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ हे या प्रकरणाचा तपास करत आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button