शेतीच्या वादातून दोन भावांमध्ये तुफान हाणामारी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :गजानन तांगडे खामगांव
खामगाव तालुक्यातील पारखेड शेत शिवारात असलेल्या वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वाटणीवरून सुरू असलेल्या वादाला उग्र स्वरूप आले शेतीच्या कामासाठी गेलेल्या भावासह त्यांच्या पत्नीला लोखंडी गज व काठीने मारहाण केल्याची घटना 22 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.
तक्रारीनुसार फिर्यादी विनोद उत्तमराव चिकटे व आरोपी मुकुंदराव चिकटे हे भाऊ असून त्यांच्यात वडिलोपार्जित शेत जमीन हिच्या वाटणीवरून वाद आहे घटनेच्या दिवशी विनोद चिकटे व त्यांची पत्नी शेतात निधन करण्यासाठी गेले होते यावेळी शेजारील शेतात असलेल्या आरोपीची सार्वजनिक रस्त्यावर शेतीच्या विषयावरून वाद झाला वाद वाढल्यानंतर मुकुंदराव चिकटे यांनी शिवीगाळ करून शेडच्या बांधकामाजवळील लोखंडी गजाने विनोद यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हाणामारी मध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली. दरम्यान,कांता चिकटे यांनी विनोद चिकटे यांच्या पत्नीला मारहाण केली असे तक्रार मध्ये नमूद केले आहे.
तक्रारीसह वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे खामगाव ग्रामीण पोलिसांनी मुकुंद उत्तमराव चिकटे (56) कांता मुकुंदराव चिकटे (60) धनंजय मुकुंदराव चिकटे (31)सर्व रा. पारखेड यांच्या विरुद्ध भारतीय न्याय सही हे संहितेच्या कलम 118(1),115(2),352,351(2),351(3)व 3(5) अनन्वये गुन्हा दाखल केला आहे.



