बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

चिखलीत प्रथमच ‘श्री नर्मदा पुराण कथा’; २५ ते ३१ ऑगस्टदरम्यान आयोजन

स्टार भारत लाईव्ह प्रतिनिधी

संजय खेडेकर

                                 चिखली : विदर्भात, विशेषतः बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच ‘श्री नर्मदा पुराण कथा’चे आयोजन चिखली येथे करण्यात आले आहे. श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वावर आयोजित या कथेत नर्मदा मैय्याची उत्पत्ती, तिचे धार्मिक महत्त्व, पश्चिमवाहिनी नदी म्हणून असलेले वैशिष्ट्य आणि नर्मदा परिक्रमेचे महत्त्व याबाबत अभ्यासपूर्ण माहिती भाविकांना मिळणार आहे.

श्री जागृत हनुमान मंदिर, राऊतवाडी बस स्टॉपजवळ २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत कथा होणार आहे. नर्मदा मैय्याच्या तीरावरील पवित्र स्थळे व घाटांचे महत्त्व, साधू-संतांचे वास्तव्य, केवळ नर्मदा दर्शनाचे पुण्य, तसेच विविध धार्मिक आख्यायिका यांची माहिती कथेतून दिली जाणार आहे.

नर्मदा मैय्याची तीन वेळा परिक्रमा केलेले श्री. मिलिंदजी यांच्या रसाळ वाणीतून ही कथा ऐकण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. नर्मदा पुराणाचा अभ्यास करून स्वयंस्फूर्तीने नर्मदा मैय्याचे माहात्म्य सर्वांपर्यंत पोहोचवि्ण्याची त्यांची भावना असल्याचे आयोजकांनी सांगितले. श्रावण महिन्यातील या पवित्र पर्वावर नर्मदा पुराण कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री जागृत हनुमान विश्वस्त मंडळ तथा भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button