बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

७.९ ग्रेड पॉईंटसह अवनी गुप्ताचे बीकॉम द्वितीय वर्षात लक्षणीय यश

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर; अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव यांच्यासह प्राचार्य व शिक्षकांकडून अभिनंदन

देऊळगाव राजा : श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बीकॉम द्वितीय वर्षाच्या २०२६ च्या परीक्षेत कुमारी अवनी सुजित गुप्ता हिने ७.९ ग्रेड पॉईंट मिळवत लक्षणीय यश संपादन केले. सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर तिने मिळवलेल्या या यशाबद्दल महाविद्यालयातून तिचे कौतुक होत आहे.

अवनीच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे तसेच शिक्षकवर्गाने तिचे अभिनंदन केले. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button