चिखली नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष श्रीराम भाऊ झोरे यांची चिखली नगरपरिषद सेवानिवृत्त कर्मचारीसंघटनेच्या अध्यक्षपदी निवड,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – सागर झगरे
चिखली:- नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष श्रीराम भाऊ झोरे यांची चिखली नगर परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काल चिखली येथे त्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
श्रीराम भाऊ झोरे यांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा अनुभव आणि सर्वसामान्यांशी असलेला जिव्हाळा यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी बांधवांच्या प्रश्नांना योग्य दिशा मिळेल, तसेच त्यांच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी ते निश्चितच भक्कमपणे उभे राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
“पद हे क्षणिक असतं, पण माणसांच्या मनात निर्माण केलेलं स्थान कायमचं असतं;
जनतेच्या सेवेत जो सदैव उभा राहतो, त्याचं नेतृत्वच खरं असतं!
या सत्कार समारंभास सर्व सेवानिवृत्त कर्मचारी बांधव तसेच चिखली नगर परिषदेचे अध्यक्ष मा. पंडितराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीराम भाऊ झोरे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सेवेतून निवृत्ती असते, समाजसेवेतून नाही!
सेवानिवृत्त कर्मचारी बांधवांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी ही वाटचाल अधिक भक्कम होवो, हीच सदिच्छा.



