भारतीय संविधानाचा सरनामा हा आत्मा : बागूल धनाजी नाना कॉलेजमध्ये संविधान दिन

प्रतिनिधी फैजपूर
येथील धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण, महोत्सव समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे भारतीय संविधान गौरव दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून संविधानाचे अभ्यासक डॉ. मिलिंद बागूल उपस्थित होते. त्यांनी संविधानाचा सरनामा हा संविधानाचा आत्मा आहे, त्यातील प्रत्येक शब्द भारतीय नागरिकांचे प्रतिनिधित्व करते, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. उदय जगताप यांनी, लोकांच्या जीवनात संविधानाचे स्थान, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, जातीव्यवस्था निर्मूलन आणि समाजजीवनात उद्भवणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न संविधानाच्या मानले. माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. म्हणून प्रत्येकाने संविधानाची एकतरी प्रत घराच्या दर्शनीय भागात ठेवावी. असे आवाहन घेतले.
केले. याप्रसंगी पत्रकार आनंदा पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जाधव उपस्थित होते.
प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी केले. अतिथींचा परिचय डॉ. एस. एल. बिऱ्हाडे यांनी करून दिला. उपप्राचार्य प्रा. डी. बी. तायडे यांनी संविधानाची शपथ दिली.
महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधानाची जनजागृती व्हावी या हेतूने ऑनलाइन ‘संविधान परीक्षा घेण्यात आली. त्यात परिसरातील नागरिक, पालक, विद्यार्थी अशा ११० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन एनएसएस प्रतिनिधी वर्षा परदेशी हिने केले. आभार प्रा. शेरसिंग पाडवी यांनी
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम



