धाडेगावच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दर्जेदार शिक्षण

जालना जिल्हा प्रतिनिधी : रामदास जाधव पाटील
जालना जिल्ह्यातील धाडेगाव हे छोटेसे गाव असले तरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि चांगले संस्कार मिळावेत, यासाठी शाळेतील शिक्षक सातत्याने प्रयत्नशील आहेत.



शाळेच्या मुख्याध्यापिका बुलबुले मॅडम तसेच सहशिक्षक शेळके सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विशेष भर दिला जात आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या समान संधी मिळणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
धाडेगाव शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ यांचेही सहकार्य महत्त्वाचे ठरत आहे.
गावातील प्रत्येक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहावा, त्याने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वतःचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल करावे, हा सर्वांचा उद्देश आहे. त्यासाठी शाळा आणि गाव यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी सरपंच भागवत मोरे, उपसरपंच कृष्णा राठोड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबासाहेब मोरे, उपाध्यक्ष रतन खरात, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.



