बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सिंदखेडराजा : मातृतीर्थातून ‘अहिल्या संदेश यात्रे’चा उत्साहात शुभारंभ; भाजप नेते डॉ. सुनील कायंदे यांनी केले अभिवादन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

सिंदखेडराजा :राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनगर समाज महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अहिल्या संदेश यात्रे’चा शुभारंभ आज मातृतीर्थ सिंदखेडराजा येथून अतिशय उत्साहात करण्यात आला. याप्रसंगी भाजप नेते डॉ. सुनील कायंदे यांनी उपस्थित राहून राजमाता जिजाऊ साहेब आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

यात्रा शुभारंभाच्या वेळी सर्वप्रथम मातृतीर्थात माँ जिजाऊ साहेबांच्या चरणी वंदन करण्यात आले. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी विचारांचा आणि समाजसेवेचा वारसा जनमानसात रुजविण्याच्या संकल्पासह या संदेश यात्रेला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप नेते डॉ. सुनील कायंदे म्हणाले की, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यातून सुशासन, समाजकल्याण, महिला सक्षमीकरण आणि अखंड लोकसेवेचा एक महान आदर्श देशासमोर निर्माण केला आहे. त्यांनी दाखवून दिलेला हाच मार्ग आजच्या पिढीसाठी दिशादर्शक आहे. अहिल्यादेवींच्या विचारांचा आणि लोककल्याणाच्या कार्याचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

“या सोहळ्याला धनगर समाज महासंघाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विजय असो’ आणि ‘माँ जिजाऊ साहेब की जय’ अशा घोषणांनी दुमदुमून गेला होता.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button