बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार साहेब व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त जवळखेड येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न!

प्रा. सदाशिव मुंढे यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील जनतेसाठी भव्य आरोग्य तपासणी शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी ; शंकर शिवरकर

देऊळगाव राजा :महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. अजितदादा पवार साहेब व साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मौजे जवळखेड (ता. देऊळगाव राजा) येथे आयोजित केलेले भव्य आरोग्य तपासणी व उपचार शिबिर रविवार, दिनांक २ ऑगस्ट रोजी अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष प्रा. श्री. सदाशिव मुंढे यांच्या वतीने या लोककल्याणकारी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

युवा आमदार मनोजभाऊ कायंदे यांच्या हस्ते उद्घाटन

या भव्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय युवा आमदार मा.श्री. मनोजभाऊ कायंदे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आमदार कायंदे यांनी प्रा. सदाशिव मुंढे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आणि ग्रामीण भागातील जनतेला अशा आरोग्य शिबिरांचा मोठा फायदा होतो, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष नाझेर काझी उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पक्षाचे विविध पदाधिकारी, डॉक्टर आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वसामान्य रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार

या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने जवळखेड आणि परिसरातील शेकडो नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली. यामध्ये प्रामुख्याने रक्तदाब, मधुमेह, डोळे तपासणी तसेच अन्य आजारांवर मोफत मार्गदर्शन व औषध वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या दारात उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मनोजभाऊ कायंदे यांनी आयोजक प्रा. सदाशिव मुंढे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.

नेत्यांच्या विचारांना सामाजिक कार्यातून अभिवादन

जयंतीनिमित्त कोणताही डामडौल न करता थेट जनतेच्या आरोग्याशी निगडित उपक्रम राबवून लोकनेते स्व. अजितदादा पवार व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यात आले, अशा भावना अध्यक्षीय भाषणात व्यक्त करण्यात आल्या. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जवळखेड ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.सदरील कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वश्री नेते श्री.इरफान अली शेख,श्री.संतोष खांडेभराड,श्री.हाजी सिद्दीक शेठ,श्री.शाम जाधव,श्री.दिलीप झोटे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा कार्याध्यक्ष श्री.शंतनु बोंद्रे, श्री.प्रकाश गिते,श्री.दिलीप सानप,श्री.छगनराव खरात,श्री.सुखदेव मुख्यदल,श्री.भगवानराव खरात,श्री.गणेशराव डोईफोडे, श्री.डी.टी.शिपने,जवळखेडच्या सरपंच सौ.शशिकलाताई गाटोळे,श्री.लक्ष्मण कव्हळे,श्री.जावळे मामा,श्री,सातपुते मामा,श्री.मारोतराव काकडे,श्री.डी.आर.चव्हाण सर,श्री.छबुराव चव्हाण,श्री.सिद्धार्थ जाधव,श्री.सुनिल शेजुळकर,श्री.प्रदीप वाघ,श्री.राजुशेठ खांडेभराड, श्री.गौरव गिते,श्री.सुखदेव शिरसाट,श्री.कैलास म्हस्के,श्री.राजुभाऊ अंभोरे,श्री.उमेश खरात,श्री.गजानन काकड, श्री.आशिष पोंधे,श्री.देवानंद गीते,श्री.दीपक चेके,श्री.नाजीम भाई, कु.शुभांगी पाखरे,श्री.बुद्धु चौधरी,श्री.विकास नागरे,भिवगावचे सरपंच श्री.घाडगे यांचेसह वैद्यकीय अधिकारी/डॉक्टर्स, पदाधिकारी,ग्रामस्थ,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button