खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसंपादकीय

खामखेडा पुलाच्या कामातील हलगर्जीपणामुळे शेतांचे नुकसान? बाधितांना न्याय देण्याची आमदार खडसेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कुऱ्हा परिसरात ढगफुटीसदृश पावसाचा कहर; पंचनामे करून तातडीने भरपाई द्या – आमदार एकनाथराव खडसेशीर्षक

खामखेडा पुलाच्या कामातील हलगर्जीपणामुळे शेतांचे नुकसान? बाधितांना न्याय देण्याची आमदार खडसेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

संपादकीय

मुक्ताईनगर,

दि. ३ ऑगस्ट : मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरात २९ व ३० जुलै रोजी झालेल्या अतिमुसळधार व ढगफुटीसदृश पावसामुळे शेतीपिकांसह अनेक नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद सदस्य तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत बाधित भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.खडसे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे कुऱ्हा परिसरातील नदी-नाल्यांना पूर आला. त्यामुळे नदीकाठील शेती आणि वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरून ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली. पुराच्या पाण्यामुळे नदीकाठील सुपीक जमीन वाहून गेली असून अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने उभी पिके पिवळी पडून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, एवढे मोठे नुकसान होऊनही प्रशासनाकडून अद्याप पंचनामे करण्यात आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.यासोबतच खामखेडा पुलाच्या सुरू असलेल्या बांधकामातील दिरंगाई आणि निष्काळजीपणाचाही त्यांनी उल्लेख केला आहे. पुलाच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या पोलभोवतीची माती वेळेत न हटविल्याने नदीच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळला गेला. परिणामी पाणी ओव्हरफ्लो होऊन शेजारच्या शेतांमध्ये घुसले आणि मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.या सर्व नुकसानीची तातडीने दखल घेऊन कुऱ्हा परिसरातील तसेच खामखेडा पुलालगतच्या बाधित शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना शासनाच्या नियमानुसार त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी आग्रही मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.दरम्यान, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून मदतकार्याला गती द्यावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button