खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरराजकीय

अश्लील वक्तव्य करणाऱ्यावर तातडीने गुन्हा दाखल करा; भाजपाचे प्रशासनाला निवेदन, तीव्र आंदोलनाचा इशारा

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

केंद्रीय राज्यमंत्री तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आलेल्या आक्षेपार्ह व अश्लील वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यानंतर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करून संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नंदुरबार येथील विजय चौधरी या व्यक्तीने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याविषयी अत्यंत अश्लील, अवमानकारक व बदनामीकारक भाषा वापरल्याचा आरोप आहे. अशा प्रकारची वक्तव्ये केवळ एका लोकप्रतिनिधीचा अपमान नसून सार्वजनिक जीवनातील महिलांच्या सन्मानावर आघात करणारी असून समाजात चुकीचा संदेश देणारी असल्याचे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, रक्षाताई खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघासह राज्यातील लाखो नागरिकांच्या लोकप्रिय लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या भावना दुखावल्या असून अशा समाजविघातक प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे.संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच इतर लागू कायद्यांनुसार तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.या मोर्चात तालुका सरचिटणीस राजेंद्र सवळे, अतुल महाजन, पंकज कोळी, जिल्हा सदस्य चंद्रकांत भोलाणे, माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख ललिता महाजन, डॉ. प्रविण पाचपांडे, सचिन पाटील, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष तथा नगरसेविका माधुरी सचिन पाटील, नगरसेविका साधना ससाणे, नगरसेवक नईम बागवान, विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आघाडी-सेलचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button