बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

देऊळगाव राजा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी; जनसागर उसळला, रॅलीने वेधले लक्ष

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा:येथे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरात अतिशय उत्साही आणि मंगलमय वातावरणात विविध सामाजिक कार्यक्रम पार पडले. या निमित्ताने समाज बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत अतिशय शिस्तीत आणि उत्साहात भव्य रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीदरम्यान शहरातील ठीकठिकाणच्या चौकांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. यामुळे संपूर्ण शहरात कमालीचा उत्साह निर्माण झाला होता. महापुरुषाला अभिवादन करण्यासाठी परिसरातील नामांकित व्यक्तिमत्त्वांसह जनसागर उसळला होता.

या महोत्सवाचे औचित्य साधून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. मनोज कायंदे यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी शहरातील विविध भागात आयोजित सामाजिक उपक्रमांना व अभिवादन कार्यक्रमांना भेटी देऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन केले.कार्यक्रमाचे गांभीर्य आणि शांतता राखण्यासाठी देऊळगाव राजा पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस प्रशासनाच्या वतीनेही लोकशाहिरांना अभिवादन करण्यात आले. तसेच नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व लोकप्रतिनिधींनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत उपस्थितांना जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.”आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत, समाजहिताचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प करूया,” असा सूर याप्रसंगी उमटला. संपूर्ण शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अत्यंत भावपूर्ण आणि विनम्र अभिवादन करण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button