अकोलाखानदेशबुलढाणामहाराष्ट्र
फ्रेंडशिप डे मधून पर्यावरण संवर्धनाचा आगळावेगळा संदेश!!!ग्रामपंचायत , आणि पहाट फाउंडेशन जस्तगाव यांचा एक अभिनव उपक्रम जल्लोषात संपन्न

*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस*
*संग्रामपुर तालुका प्रतिनिधी*
*रतन भगत*
संग्रामपूर दि.2/८/२६ सविस्तर वृत्त असे की आज संपूर्ण विश्वामध्ये फ्रेंडशिप डे हा अत्यंत आनंदाने साजरा करण्यात आला आहे. त्यामुळे फ्रेंडशिप डेनिमित्त पर्यावरणाशी मैत्रीचा अनोखा संदेश देत पहाट फाउंडेशन आणि ग्राम पंचायत जास्त गाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला एक मैत्री पर्यावरणासोबत एक मैत्री झाडासोबत हा वृक्षारोपण व वृक्ष संगोपनाचा उपक्रम मोठ्या उत्साहात आणि लोकसहभागातून अत्यंत जल्लोषात संपन्न झाला.
या उपक्रमामध्ये ५० पेक्षा अधिक देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे केवळ वृक्षारोपण न करता त्यांच्या संगोपनाची जबाबदारी गावातील सर्वच युवकांनी स्वखुसेने स्वीकारले हा या उपक्रमाचा विशेष ठरला. गावातील हनुमान मंदिर परिसर, बुद्ध विहार परिसर, जिल्हा परिषद शाळा तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक झाडाला फ्रेंडशिप बँड बांधून झाडांची मैत्री करण्याचा अनोखा संदेश देण्यात आला. उपस्थित सर्व गावकऱ्यांनी झाडांचे संरक्षण व संगोपन करण्याची सामूहिक शपथ घेत पर्यावरण संवादनाचा संकल्प केला. यावेळी जास्त गावचे सरपंच सुमित डोसे, उपसरपंच हिम्मतराव सोनोने, पहाट फाउंडेशनचे संचालक अमोल भिलंगे, मंगेश दही, विद्या भूषण वानखडे, कैलास वसतकार, शिवहरी डोसे, कपिल डोसे, जगन्नाथ गवांदे, कपिल वानखडे, आशिष वानखडे, सुभाष अंदुरकर, शालिग्राम वानखडे, सिद्धार्थ तायडे, आम्रपाल भिलंगे, रमेश पुंडे, रामधन साबे, गजानन चोपडे, आदित्य गव्हांदे, अजय वानखडे यांच्यासह गावातील नवयुवक आणि ग्रामस्थ या कार्यक्रमाच्या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमातून खरी मैत्री ही निसर्गाची आणि झाडांशी असली पाहिजे हा प्रभावी संधी समाजापर्यंत पोहोचवला. पर्यावरण संवर्धनासाठी लोकसभा वाढवणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून भविष्यातील अशा सामाजिक व पर्यावरण पूरक उपक्रमाचे आयोजन करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
यावेळी पहाट फाउंडेशन संचालक जास्त गाव अमोल फिरंगी यांनी फ्रेंडशिप डे हा केवळ मित्रांसोबत आनंद साजरा करण्याचा दिवस नसून निसर्गाशी आपली मैत्री अधिक दृढ करण्याची संधी आहे याच भावनेतून एक मैत्री पर्यावरणासोबत एक मैत्री झाडासोबत हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. आम्ही 50 पेक्षा अधिक देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली असून त्यांचे संगोपण करण्याची जबाबदारी गावातील लोकांनी स्वीकारते आहे झाडांना फ्रेंडशिप बँड बांधून त्यांच्या संरक्षणाची शपथ घेणे हा एक अनोखा आणि प्रेरणादायी संदेश आहे. प्रत्येकाने आयुष्यात किमान एका झाडाची मैत्री करून त्याचे संगोपन केले तर पर्यावरण संवर्धनाची मोठी चळवळ उभी राहू शकते.
या कार्यक्रमाचे आयोजन जस्तगाव ग्रामपंचायतचे तडफदार युवा सरपंच माननीय सुमित डोसे यांनी केले होते. जस्तगाव ग्रामपंचायतीच्या पहाट फाउंडेशन सोबत असा सामाजिक आणि पर्यावरण प्रकल्प राबविल्या जात असल्याचा आनंद हा प्रत्येक गावातील युवक महिला आणि ग्रामस्थाना झाला आहे. जस्तगाव गावचे सरपंच मा. सुमित डोसे यांनी गावातील प्रत्येक नागरिकांनी किमान एक तरी झाड लावून ते जगून दाखविले पाहिजे असा या कार्यक्रमाच्या वेळी संदेश गावातील उपस्थित जनसमुदायांना दिला.



