खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरराजकीय

मुक्ताईनगरात अतिक्रमणाविरोधात प्रशासनाचा बडगा? व्यावसायिकांमध्ये खळबळ

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

मुक्ताईनगर शहरात सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणाविरोधात लवकरच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शहरातील अनेक व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. संभाव्य कारवाईच्या चर्चेनंतर काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकानाबाहेरील साहित्य हटविण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांना होणारा त्रास आणि अपघाताचा धोका वाढत असल्याने प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत संबंधित प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

नागरिकांनी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला पाठिंबा देत शहरातील रस्ते मोकळे करण्याची मागणी केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनी प्रशासनाच्या कारवाईची वाट न पाहता स्वखुशीने अतिक्रमण हटवावे, असेही अनेक नागरिकांचे मत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button