लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात; अंतुर्ली इंदिरानगरात समता, स्वाभिमान आणि शिक्षणाचा संदेश

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
अंतुर्ली : मुक्ताईनगर
तालुक्यातील अंतुर्ली येथील इंदिरानगर परिसरात मातंग समाजाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. समता, स्वाभिमान, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विशेष लक्षवेधी ठरला.कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र प्रदेश व्हीजेएनटी (VJNT) विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी एस. एम. पगारे यांनी मार्गदर्शन करताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा सामाजिक परिवर्तनातील प्रभाव अधोरेखित केला. समाजातील शोषण, अन्याय, विषमता आणि अस्पृश्यतेविरोधात अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून संघर्ष उभा केला. त्यांनी दलित, शोषित, पीडित, वंचित, भटक्या-विमुक्त, शेतकरी, कामगार आणि महिलांच्या वेदनांना आपल्या साहित्याचा केंद्रबिंदू बनवत समाजप्रबोधनाचे महान कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या संदेशाचा उल्लेख करत श्री. पगारे यांनी सामाजिक परिवर्तनासाठी मानसिक बदल आणि शिक्षणाची गरज अधोरेखित केली. जातीभेद व अस्पृश्यतेमुळे माणसाच्या स्वाभिमानावर होणारा आघात दूर करण्यासाठी समाजाने शिक्षण, संघटन आणि मानवतेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.अवघ्या दीड दिवसांचे औपचारिक शिक्षण लाभूनही अण्णाभाऊ साठे यांनी ३७ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, ११ पोवाडे, ३ नाटके, प्रवासवर्णने, लावण्या आणि शेकडो गीतांच्या माध्यमातून मराठी साहित्य समृद्ध केले. “ही पृथ्वी शेषाच्या फण्यावर नव्हे, तर कामगारांच्या तळहातावर तरली आहे,” हा त्यांचा विचार आजही समाजाला प्रेरणा देणारा असल्याचे श्री. पगारे यांनी नमूद केले.कार्यक्रमाला पोलीस पाटील किशोर मेढे, शिक्षण विस्तार अधिकारी एस. एम. पगारे, शेख भैय्या शे. करीम, किरण धायले, सुनील घेटे, दगडू उबाळे, सुमनबाई उबाळे, राजेंद्र शिरतुरे, अक्षय पेठारे, भास्कर शेलार, भगवान शेलार यांच्यासह समाजबांधव, महिला, युवक आणि बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनुसया उबाळे, आकाश उबाळे, यमुबाई शेलार, इंदुबाई उबाळे, ममता शेलार, मोहन शेलार, सुरेश शेलार, भास्कर शेलार, गोविंदा उबाळे, कल्पेश उबाळे, देवानंद पवार, मंगला शेलार तसेच समाजातील तरुण मंडळींनी विशेष परिश्रम घेतले.



