रावेर शिक्षण संवर्धक संघ, रावेर शताब्दी वर्ष वारकरी दिंडीचे आयोजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता प्रतिनिधी :-विकास आमोदकर
आज दिनांक 24/07/2026 शुक्रवार या दिवशी रावेर शिक्षण संवर्धक संघ, रावेर शताब्दी वर्ष निमित्ताने वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते,
सदर दिंडीत रावेर शिक्षण संवर्धक संघ, रावेर संचालित सरदार जी जी प्राथमिक विद्यामंदीर, रावेर, सौ कमलाबाई एस अग्रवाल प्राथमिक विद्यामंदिर, रावेर आणि सरदार जी जी हायस्कूल, रावेर तसेच सौ कमलाबाई एस अग्रवाल कन्या शाळा,
रावेर शाळांचे विद्यार्थी, शिक्षक/शिक्षिका, कर्मचारी सहभागी दिंडीचे आणि विठ्ठल–रुक्मिणी यांचे पुजन संस्थेचे चेअरमन श्री संतोष शेठ अग्रवाल सपत्नीक , अध्यक्ष श्री देवेंद्र मिसर माजी चेअरमन श्री शीतल पाटील, संचालक श्री शैलेंद्रकुमार देशमुख यांनी सपत्नीक केले. संचालक मंडळ प्रतिनिधी माजी चेअरमन डॉ. दत्तप्रसाद दलाल, संचालक श्री राजेंद्र अग्रवाल ,श्री तुषार मानकर, श्री महेश अत्रे, श्री विजय लोहार तर सरदार जी जी हायस्कूल, चे मुख्याध्यापक आर आर पाटील, सौ कमलाबाई एस अग्रवाल कन्या शाळेच्या
मुख्याध्यापिका सौ पी जे कुलकर्णी, सहसचिव श्री बी आर महाजन, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना पाटील व व्यवस्थापक श्री बी डी पाटील, उच्च माध्यमिक विभागाचे उप प्राचार्य श्री शैलेश राणे, श्री एम जी पाटील आणि दिंडीसाठी चेअरमन, अध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि संचालक मंडळ यांच्या सोबत श्री युवराज माळी सर, श्री अजय महाजन सर, श्री दानी सर पत्रकार दीपक नगरे इ. सहकाऱ्यांचे खास सहकार्य लाभले.
संस्थेतील सर्व शिक्षक/शिक्षिका, कर्मचारी यांनी उपस्थित राहून दिंडी नियोजनात मोलाचे सहकार्य केले त्याच सोबत सर्व विद्यार्थी उपस्थित होते.



