खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

नगरपालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात ‘शहर विकास आघाडी’चा मासिक सभेवर बहिष्कार; प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने​स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी शंकर शिवरकर

​देउळगाव राजा: नगरपालिका प्रशासनाचा मनमानी कारभार, नगरसेवकांच्या मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष आणि प्रभागातील विकासकामांना दिली जाणारी दुजाभावाची वागणूक याविरोधात आज ‘शहर विकास आघाडी’च्या सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी मासिक सभेवर बहिष्कार टाकला. सभेचा त्याग केल्यानंतर सर्व लोकप्रतिनिधींनी नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ठिय्या मांडून पालिका प्रशासन, अध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.
​आंदोलनाचे प्रमुख कारण व मागण्या:
​जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष: प्रभागातील नागरिकांनी दिलेल्या विविध समस्या व तक्रारींबाबत पालिका अध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही आणि प्रशासनाकडून कसलेही स्पष्टीकरण दिले जात नाही.
​विरोधकांसाठी केबिनची व्यवस्था नाही: विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसाठी पालिकेत बसण्यासाठी केबिनची व्यवस्था करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे. सत्ताधारी पक्षातील गटनेता, सभापती यांना स्वतंत्र केबीन उपलब्ध केल्या
मात्र विरोधी पक्ष नेत्या / गटनेता यांना केबिन उपलब्ध करण्यास टाळाटाळ करत आहे. मात्र प्रशासन याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. यामुळे पालिकेत येणाऱ्या महिला नगरसेविकांना बसण्यासाठी व प्रशासकीय कामकाज करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
​ऐनवेळी टिपणी सादर करणे: नियमानुसार मासिक सभेच्या विषय पत्रिकेसोबत स्पष्टीकरणात्मक टिपणी देणे बंधनकारक आहे. मात्र, टिपणी ऐनवेळी मासिक सभेत सादर केली जाते. त्यामुळे विषयांचा अभ्यास करून त्यावर योग्य चर्चा करणे अशक्य होते.
​विकासकामांना डावलणे: नगरसेवक व नगरसेविकांनी आपापल्या प्रभागातील विकासकामांचे प्रस्तावित विषय विषय पत्रिकेत घेण्याची मागणी केली असता, ते विषय जाणीवपूर्वक डावलले जात आहेत.
​प्रशासकीय अनागोंदी आणि लोकप्रतिनिधींना दिली जाणारी अयोग्य वागणूक यामुळेच आजच्या सभेवर बहिष्कार टाकून प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
​उपस्थित नगरसेवक व नगरसेविका:
या निदर्शनामध्ये शहर विकास आघाडीच्या गटनेत्या रंजना रामाने, नगरसेवक कोटकर काशीफ खान , नगरसेविका दिशा खांडेभराड, नगरसेवक शिवाजी मेहत्रे, शितल खरात, विद्या कासारे, अनुमाया यांच्यासह आघाडीचे इतर सर्व नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button