करुणा आणि समतेच्या विचारांना नवी दिशा देण्याचे काम भगवान गौतम बुद्ध यांनी केले.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस सा.आवाज न्यायाचा
चिखली तालुका प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
भादोला येथे नवीन बुद्धविहाराच्या भूमिपूजनाचा शुभारंभ…
तथागत भगवान गौतम बुद्धांनी जगाला दिलेला प्रज्ञा, शील, करुणा,समता आणि मानवतेचा संदेश हा केवळ एका धर्मापुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीला शांतता आणि माणुसकीची वाट दाखविणारा आहे. याच महान विचारांचा प्रसार करणाऱ्या नवीन बुद्धविहाराच्या निर्माणकार्याचा शुभारंभ होत असताना या पवित्र क्षणाची साक्षीदार होण्याचा भावनिक योग चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यांना लाभला.
बुलढाणा मतदारसंघातील मौजे भादोला येथे बुद्ध रश्मी महाविहार, बुलढाणा यांच्या वतीने नवीन बुद्धविहारासाठी खरेदी करण्यात आलेल्या भूमीवर आज पावन भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या मंगल प्रसंगी आमदार श्वेता महाले पाटील यांनी उपस्थित राहून बुद्धविहाराच्या निर्माणकार्याला शुभेच्छा दिल्या.
भगवान बुद्धांनी “वैराने वैर कधीही संपत नाही; प्रेमानेच वैर संपते” असा मानवतेला संदेश दिला. आज समाजात वाढत चाललेल्या तणावाच्या आणि मतभेदांच्या वातावरणात बुद्धांचे हे विचार अधिकच प्रासंगिक ठरत आहेत. माणसामाणसांमध्ये भेद न करता समता, बंधुता आणि करुणेची भावना रुजविणारे केंद्र म्हणून हा बुद्धविहार भविष्यात समाजासाठी प्रेरणास्थान ठरेल, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
आमदार श्वेता महाले पाटील यांनी या पवित्र भूमीवर माथा टेकवत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांना अभिवादन केले. विकासाची वाट चालताना समाजाच्या मनात माणुसकी, समता आणि संवेदनशीलता जिवंत राहणे तितकेच महत्त्वाचे आहे, या भावनेतून त्यांनी बुद्धविहाराच्या भावी कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या वेळी पूजनीय भन्ते यांचे आशीर्वाद घेतले. भूमिपूजन सोहळ्यास भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री. संजयजी गाडेकर, जिल्हा सरचिटणीस श्री. दत्ता पाटील, शहराध्यक्ष श्री. मंदारजी बाहेकर, सरपंच श्री. संजयजी ठेंग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते…✍️



