बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सामाजिक बांधिलकी जपत शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव बापू देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली तालुखा प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

▪️रुग्णालयात फळवाटप, श्री रेणुका देवी चरणी खण-पातळ अर्पण; चिखलीत शिवसैनिकांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा

चिखली
बुलढाणा शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव बापू देशमुख यांचा वाढदिवस केवळ औपचारिक शुभेच्छांपुरता मर्यादित न राहता विविध सामाजिक उपक्रमांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. युवा सेना बुलढाणा जिल्हाप्रमुख तथा अमरावती-अकोला-बुलढाणा युवा सेना संपर्कप्रमुख ऋषीभाऊ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, महिला जिल्हाप्रमुख सौ. मायाताई म्हस्के, जिल्हा समन्वयक सौ. अनुजाताई सावळे तसेच तालुकाप्रमुख गजानन मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

चिखली येथील शासकीय विश्रामगृहात शिवाजीराव बापू देशमुख यांचा भव्य सत्कार करून अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. त्यानंतर चिखली उपजिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच चिखलीचे आराध्य दैवत श्री रेणुका देवी यांच्या चरणी खण-पातळ अर्पण करून त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेच्या कार्याला अधिक बळ मिळावे, अशी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवाजीराव बापू देशमुख यांच्या संघटन कौशल्याचा, कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा आणि सामाजिक कार्यातील सक्रिय योगदानाचा गौरव करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याची परंपरा प्रेरणादायी असल्याचेही अनेकांनी नमूद केले.

कार्यक्रमाला शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख सौ. कल्पनाताई बोधेकर, युवा सेना चिखली तालुका संपर्कप्रमुख अनमोल ढोरे पाटील, युवासेना तालुकाप्रमुख✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button