जळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर

ग्रामीण खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षणाचे बळ; रावेरच्या व्ही. एस. नाईक महाविद्यालयात मिशन लक्ष्यवेध उपक्रम उत्साहात


ग्रामीण खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षणाचे बळ; रावेरच्या व्ही. एस. नाईक महाविद्यालयात मिशन लक्ष्यवेध उपक्रम उत्साहात

रावेर | प्रतिनिधी : विकास आमोदकर | स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन लक्ष्यवेध’ योजनेअंतर्गत श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेटलिफ्टिंग प्रशिक्षणासाठी मंजूर करण्यात आलेल्या अत्याधुनिक वेटलिफ्टिंग संचाचे (Weightlifting Set) लोकार्पण, खेळाडूंना ट्रॅकसूट वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी सक्षम तयारीची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हेमंतदादा नाईक होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ‘मिशन लक्ष्यवेध’ ही योजना ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंसाठी अत्यंत उपयुक्त असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होतील. संस्था भविष्यातही क्रीडा विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले की, या सुविधांमुळे वेटलिफ्टिंग खेळाला मोठी चालना मिळणार असून महाविद्यालयातील खेळाडू राष्ट्रीय, आशियाई, राष्ट्रकुल तसेच ऑलिंपिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपप्राचार्य प्रा. एस. यू. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडेलाही तितकेच महत्त्व असल्याचे सांगत शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. उमेश नारायण पाटील यांनी सांगितले की, अत्याधुनिक वेटलिफ्टिंग संच आणि ट्रॅकसूटमुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल. आधुनिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकणारे खेळाडू घडविण्यासाठी महाविद्यालय अधिक जोमाने कार्य करणार असून, हा महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी नॅक समन्वयक डॉ. बी. जी. मुख्यदल, प्रा. चतुर गाडे, प्रा. सत्यशील धनले, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक योगेश महाजन, मिशन लक्ष्यवेध प्रशिक्षक विष्णू भोई तसेच संदीप महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करत खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्र शासन तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. मिशन लक्ष्यवेध योजनेच्या माध्यमातून श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालयातील खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयासह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button