खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रसंपादकीय

जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र सायबरचे विविध सायबर पोर्टल्सवर प्रशिक्षण; ९१ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग


सायबर गुन्ह्यांच्या प्रभावी तपासासाठी जळगाव पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

संपादकीय बातमी :

जळगाव (प्रतिनिधी) : सायबर गुन्ह्यांचा वाढता धोका लक्षात घेऊन त्यांचा प्रभावी तपास व जलद निपटारा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सायबरच्या वतीने जळगाव जिल्ह्यात विविध सायबर पोर्टल्स व ॲप्लिकेशन्ससंदर्भात विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या प्रशिक्षणात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील एकूण ९१ पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. प्रशिक्षणादरम्यान ई-झिरो एफआयआर, समन्वय पोर्टल, सहयोग पोर्टल, एमआरएम (MRM), जीआरएम (GRM) तसेच सीसीआरपी (CCRP) पोर्टल यांसह विविध सायबर प्रणालींचा प्रभावी वापर, त्यांची कार्यपद्धती आणि सायबर गुन्ह्यांच्या तपासात त्यांचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर तसेच सायबर पोलीस स्टेशनमधील विविध ॲप्लिकेशन्सचे तांत्रिक ज्ञान असलेले अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र सायबरच्या प्रशिक्षकांनी विविध सायबर पोर्टल्सचा प्रत्यक्ष वापर, डिजिटल पुरावे हाताळण्याची प्रक्रिया, ऑनलाइन फसवणूक व इतर सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी आवश्यक तांत्रिक बाबी याबाबत सखोल माहिती दिली. या प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सायबर गुन्ह्यांच्या तपासातील क्षमता अधिक बळकट होणार असून, नागरिकांना अधिक जलद आणि प्रभावी सेवा देण्यास मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button