खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीय

जळगावात ‘हॉटेल गिरीजा’चे भव्य उद्घाटन; नवीन उद्योगाला मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

जळगावात ‘हॉटेल गिरीजा’चे भव्य उद्घाटन; नवीन उद्योगाला मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

:हर्षराज पाटील यांनी उद्घाटन सोहळ्यास सदिच्छा भेट देत ललित खुरपडे यांना दिल्या यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छाजळगाव | प्रतिनिधीजळगाव शहरातील हॉटेल गिरीजाच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात मान्यवरांची उपस्थिती लाभली. या प्रसंगी हर्षराज पाटील यांनी सदिच्छा भेट देत हॉटेलच्या नव्या उपक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.हॉटेल गिरीजाचे संचालक संजूभाऊ काळे यांचे भाचे तथा उद्योजक ललित राजेंद्र खुरपडे यांनी सुरू केलेल्या या नव्या व्यवसायाचे कौतुक करत हर्षराज पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. नवीन उद्योगाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासह आर्थिक विकासालाही हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी त्यांनी ललित खुरपडे यांना व्यवसायाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत, ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळून हॉटेल गिरीजा यशाच्या नव्या शिखरावर पोहोचो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.या उद्घाटन सोहळ्यास राजेंद्र खुरपडे, ललित खुरपडे, संजय काळे, विजय काळे यांच्यासह काळे परिवार, खुरपडे परिवार तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थितांनी नव्या उपक्रमाचे स्वागत करत शुभेच्छांचा वर्षाव केला.स्थानिक उद्योजकतेला चालना देणारे असे उद्योग-व्यवसाय हे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. हॉटेल गिरीजाची आगामी वाटचाल यशस्वी होवो, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button