शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या तसेच बोगस बियाणे पुरवणाऱ्या कंपनी विरोधात तत्काळ गुन्हे नोंदवावेत! नुकसान भरपाई द्यावी!! आमदार नितीन देशमुख.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस.
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी रतन भगत.
बाळापुर दि. ८/७/२६. सविस्तर वृत्त असे की भारत हा कृषीप्रधान देश आहे असे म्हणतात, परंतु ह्या कृषीचा गाभा म्हणजे शेतकरी हा फार मोठ्या संकटात सापडलेला आहे. कारण वर्षभराच्या आर्थिक नियोजन हे खरीप हंगामातील विविध पिकांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असताना सोयाबीनचे बोगस व निकृष्ट बियाणे पुरवणाऱ्या कंपन्या विरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करावी शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्या कंपन्यांना शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २५००० रुपये आर्थिक मदत देण्यास शासनाने बाद्य करावे असे आवाहन बाळापूरचे आमदार नेते देशमुख यांनी केले आहे. यावर्षीचे खरीप हंगामातील विविध पिकांचे शेतकऱ्यांनी लागवड केली असून कापूस ,सोयाबीन , तुर, मुंग, उडीद आधी पिकांची शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. खरी पाटील पिकांवर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून असताना विशिष्ट कंपन्यांनी आर्थिक हव्यासापाई शेतकऱ्यांना निकृष्ट व बोगस बियाणे पुरवले असे बियाणे उगवल्या नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक चक्रव्यूहात अडकला आहे. सोयाबीन मधील काही विशिष्ट कंपन्या निकृष्ट बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बियाणे उत्पादक कंपन्यान विरुद्ध कायदेशीर अशी कारवाई करण्यात व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विना विलंब हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यास बियाणे उत्पादक कंपन्यांना बाध्य करावे, असे आवाहन बाळापुर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी केले असून या संदर्भात विधानभवनात आवाज उठवणार असल्याचे देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले.



