वाशिम वरून मुंबई जाणे झाले सोप्पे; बहुप्रतिक्षित नांदेड-कुर्ला रेल्वेसेवा झाली सुरू.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी वाशिम : बऱ्याच दिवसांपासून वाशिमकरांना प्रतीक्षा असलेली रेल्वेसेवा सोमवारपासून सुरू झाली असून आज नांदेड-कुर्ला एक्सप्रेसच्या इनॉग्रल स्पेशल क्र. 07667 या गाडीला नांदेड येथून हिरवा झेंडा दाखवून या सेवेचे उद्घाटन करण्यात आले आहे. नियमित सेवा गाडी क्र. 17665/17667 दर सोमवार आणि बुधवारी रात्री 09.15 मिनिटांनी नांदेड येथून निघून पूर्णा, वसमत, हिंगोली या मार्गे वाशिमला मध्यरात्री 01.15 मिनिटांनी असेल तसेच ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता कुर्ला येथे पोहोचेल तर गाडी क्र. 17666/17668 दर मंगळवार आणि गुरुवारला कुर्ला येथून दुपारी 04.55 मिनिटांनी निघून ही गाडी वाशिमला दुसऱ्या दिवशी सकाळी 04.15 मिनिटांनी पोहोचेल.
या आधी या सेवेचे उद्घाटन होणार होते परंतू आचारसंहिता लागू झाल्यामुळें या गाडीचा उद्घाटन सोहळा रखडला होता.
पूर्वी सुरू असलेली अजनी – कुर्ला गाडी बंद केल्याने वाशिमकरांना मुंबईशी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी नसल्याने अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून होत असलेली मागणी आज पूर्णत्वाला गेली आहे.
या सेवेमुळे वाशिम सह हिंगोली, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील प्रवाश्यांना लाभ होणार असून व्यापारी वर्गाला याचा विशेष फायदा होणार आहे.



