बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखीचे जल्लोषात स्वागत; हजारो वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी ; शंकर शिवरकर

देऊळगाव राजा, दि. ३ जुलै : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या आदिशक्ती संत मुक्ताबाई महाराजांच्या पालखीचे देऊळगाव राजातील श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीत शुक्रवारी (दि. ३) दुपारी ३ वाजता फटाक्यांची आतषबाजी, टाळ-मृदंगाचा गजर आणि जयघोषात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
पालखी आगमनावेळी महसूल विभाग व ठाणेदार ब्रह्मगिरी पोलीस प्रशासनाच्या वतीने नियोजनबद्ध स्वागत करण्यात आले. तसेच आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ, नगराध्यक्षा माधुरीताई, शिंपणे उपाध्यक्ष सौ वनिता भुतडा,, गटनेते प्रदीप वाघ, सौ मीना दराडे सौ उषा गीते सर्व नगरसेवक, नगरसेविका पदाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महसूल विभागाचे तलाठी तागवाले, मांन्टे व स्वागत सोहळ्यात सहभाग नोंदविला.
आमदार मनोज कायंदे यांच्या वतीने सतीश कांयदे, श्रीमती नंदाताई कायंदे यांनी पालखीचे भावपूर्ण स्वागत केले. तसेच समर्थ आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. ताठे सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी वारकऱ्यांचे स्वागत करून सेवाभाव जपला.
पालखीसोबत आलेल्या हजारो वारकऱ्यांच्या निवास व भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था आर्या लॉन्स व अस्मिता लॉन्सचे संचालक रामाणे परिवार यांच्या वतीने करण्यात आली. वारकरी सेवेसाठी केलेल्या या व्यवस्थेचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
यानंतर पालखीचा विसावा श्री संत धोंडीराज महाराज मठात देण्यात आला असून तेथे पालखीचा मुक्काम आहे. पालखी दर्शनासाठी शहरासह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महिला, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण देऊळगाव राजा “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने दुमदुमून गेला.
आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखीच्या स्वागत सोहळ्याने देऊळगाव राजाची धार्मिक परंपरा, वारकरी संस्कृती आणि सेवाभाव पुन्हा एकदा अधोरेखित केला. भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा हा अविस्मरणीय सोहळा ठरला.

………………..
शेकडो वर्षाची परंपरा असलेले संत मुक्ताबाईची विदर्भाची लेकीची श्री बालाजी महाराजांचे मुख्य संस्थांचे वतीने स्वागतासाठी किंवा कोणत्याही प्रकारचा सहभाग नोंदवल्या जात नाही त्यामुळे शहरांमध्ये जाणकारांमध्ये चर्चा होते विदर्भाच्या आदिशक्ती 600 किलोमीटरचा प्रवास करून पंढरपुरी जात असते या पायी वारीमध्ये हजारो भाविक भक्त असतात मात्र
श्री बालाजी महाराजांच्या संस्थांच्या वतीने कोणतीही योगदान दिल्या जात नाही अशी खंत व्यक्ती केली जात आहे.

  ॲड. राजेश  मान्टे 

(विधीतज्ञ देऊळगाव राजा)

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button