बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

वैदू समाजातील पहिले ठाणेदार;श्री मल्हारी दुर्गादास शिवरकर यांचीपरळी ग्रामीण पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती समाजामध्ये आनंदाचा वातावरण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:– शंकर शिवरकर

देऊळगाव राजा, हे मुळगाव येथून आपली प्रवास सुरू केला त्यांनी अतिशय कष्टातून शिक्षण घेऊन त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केला व समाजाचा नाव मोठा केला
वैदू समाज हा अतिशय कमी शिकलेला समाज म्हणून ओळखला जात होता अलीकडच्या काळात बदलत्या काळानुसार समाजामध्ये एक चांगला वातावरण निर्माण झालेला आहे एके काळी वैदू समाज हा शिक्षणापासून वंचित राहत होता सुविधा मिळत नव्हती, त्या अतिशय कठीण परिश्रमावर मात करून आज वैदू समाजा मधून असंख्य मुलं शिकून मोठ्या पदावर चालले
आज त्यातूनच एक उत्तम उदाहरण म्हणजे मल्हारी शिवरकर साहेब हे अतिशय कठीण परिश्रम घरची परिस्थिती नाजूक असताना त्यांनी स्वतःला सावरलं, जीत चिकाटी ठेवून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि आज कॉन्स्टेबल पासून ते आज ठाणेदार झाले यांच्या या कामगिरीमुळे येणाऱ्या काळात समाजामध्ये युवा वर्गाला नक्कीच प्रेरणादायी व अजून समाजात शिक्षणाबाबतीत जागृत निर्माण होईल
कठोर शिस्त, प्रभावी नेतृत्व आणि जनतेच्या सुरक्षिततेसाठी झटणारे अधिकारी!
उपनिरीक्षक, (API), या पदावर आपली उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर
पोलीस निरीक्षक श्री मल्हारी दुर्गादास शिवरकर यांची
परळी ग्रामीण पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाई करणे, संवेदनशील प्रकरणांचा तपास आणि नागरिकांशी विश्वासाचे नाते निर्माण करणे या सर्व क्षेत्रांत त्यांनी मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्ह्यांचा यशस्वी छडा लागला, गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई झाली आणि पोलीस-जनता समन्वय अधिक मजबूत झाला. कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि प्रशासनातील प्रभावी नेतृत्व यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
नवीन जबाबदारी, नवीन आव्हाने आणि अधिक व्यापक कार्यक्षेत्रासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या पुढील कारकिर्दीतही असेच यश, सन्मान आणि जनसेवेची उज्ज्वल परंपरा कायम राहो, हीच सदिच्छा.
“कर्तव्य हाच धर्म, सेवा हाच संकल्प”

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button