बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

घरासमोर येऊन दाम्पत्याला मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी: – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा | प्रतिनिधी
तालुक्यातील गिरोली बु. येथे किरकोळ वादातून एका दाम्पत्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल अशोक कुसळकर (वय २५, रा. गिरोली बु.) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी अनिल साहेबराव चव्हाण, सोनू नामदेव पवार, पूजा अनिल चव्हाण, शीतल ऊर्फ सविता प्रभाकर मुंदळकर, रेणुका नामदेव पवार आणि गंगाबाई साहेबराव चव्हाण (सर्व रा. गिरोली बु.) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना १८ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी व आरोपी हे एकाच समाजातील असून, आरोपी अनिल चव्हाण याने फिर्यादीला त्याच्या चुलत भावाशी बोलण्याबाबत जाब विचारला. त्यावेळी फिर्यादीने आपण केवळ मजाक करत असल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळाने सर्व आरोपींनी एकत्र येऊन फिर्यादीच्या घरी जाऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
फिर्यादी व त्यांच्या पत्नीने शिवीगाळीबाबत विचारणा केली असता, आरोपींनी विजय याला शिवीगाळ केल्याचा आरोप करत फिर्यादीला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी अनिल चव्हाण व सोनू पवार यांनी हातातील लाकडी काठीने फिर्यादीच्या उजव्या दंडावर व पाठीवर वार करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
मारहाण सोडविण्यासाठी फिर्यादीची पत्नी मध्ये पडली असता आरोपी पूजा चव्हाण, शीतल ऊर्फ सविता मुंदळकर, रेणुका पवार व गंगाबाई चव्हाण यांनी तिलाही मारहाण करून तिच्या उजव्या हाताचे बोट मुरगळल्याचा आरोप आहे. तसेच सर्व आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीच्या तोंडी जबाब व वैद्यकीय अहवालावरून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात कायम अप. क्र. २७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय गोरे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button