अकोला एटीएसची सोनाळा येथे कार्यवाही पिस्तूल जप्त; अकोट तालुक्यातील अंबोडाचे २ जण जेरबंद

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहुरकर
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पो.स्टे. हद्दीत दुचाकीने देशी पिस्तूल घेवून जात असतांना दोघांना रंगेहात पकडून त्यांचे कडील देशी पिस्तूल सह ६१ हजार ९१५ रु.चा मुद्देमाल जप्त करून दोघां विरुद्ध सोनाळा पो.स्टे. ला आर्म अक्ट नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सदर कारवाई अकोला दहशतवाद विरोधी पथकाने केली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा हिवरखेड मार्गावर दोघेजण मोटरसायकल क्र.एम.
एच.३० बीएच ७७०२ ने देशी पिस्तूल घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वा. दरम्यान पोलिसांनी छापा मारून त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कडून देशी बनावटीची एक पिस्तूल आढळून आली. त्यावरून अकोला दहशतवाद
विरोधी पथकाचे सुनील रामकृष्ण सिरसाठ यांचे फिर्यादी वरून सोनाळा पो.स्टे.ला अप क्र, २१५/२०२३ कलम २३, ३, २५ आर्मअक्ट नुसार गुन्हा दाखल करून आरोपी राजेश महेश कोमटी वय २६ वर्ष व महादेव जेज्या शिवरकर वय २७ वर्षे रा. अंबोडा जि. आकोला या दोघांना
ताब्यात घेवून अटक करण्यात आली.
त्यांचेकडून मोटरसायकल, ३ मोबाईल व एक देशी पिस् तरतूल असा एकूण ६१ हजार ९१५ रु. चा मुद्देमाल माल जप्त करण्यात आला. पुढील तपास सोनाळा पो.स्टे. चे ठाणेदार चंद्रकांत पाटील करीत आहेत.
मध्यप्रदेशातून अवैध शस्त्रांची तस्करी
सातपुड्याच्या पायथ्याशी व मध्य प्रदेश सीमे लागत असलेल्या संग्रामपूर तालुक्यात यापूर्वी अनेक वेळा अशाप्रकारच्या शस्त्रांची तस्करी करतांना पकडण्यात आले होते. विशेष म्हणजे मागील वर्षीही टुनकी येथे श्री संत सोनाजी महाराज यांचे यात्रा उत्सवादरम्यान देशी पिस्तूल तस्करी करतांना पकडण्यात आले होते. यावर्षीही सोनाळा येथील श्री संत सोनाजी महाराज यात्रेच्या काही दिवस अगोदर पुन्हा देशी पिस्तूल तस्करी करतांना पकडण्यात आले. यावरून मध्य प्रदेशातून संग्रामपूर तालुक्यातून अश्या अवैध शस्त्रांची तस्करी जास्त प्रमाणात होत असल्याची चर्चा आहे.



