शिवसेनेचे ६ खासदार फुटलेदेऊळगाव राजा बस स्टँड चौकातगद्दार खासदारांच्या प्रतिकृतीला जोडे मारून व प्रतिकृती जाळून निषेध

शिवसेनेचे ६ खासदार फुटले
देऊळगाव राजा बस स्टँड चौकात
गद्दार खासदारांच्या प्रतिकृतीला जोडे मारून व प्रतिकृती जाळून निषेध
“विश्वासघात करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही”; उबाठा शिवसैनिकांचा संताप
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:– शंकर शिवरकर
देऊळगाव राजा .:– शिवसेना पक्षाच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त देऊळगाव राजा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाशी कथित विश्वासघात केल्याचा आरोप करत सहा खासदारांच्या प्रतिकृतीचा जोडे मारून निषेध व्यक्त केला. यावेळी “गद्दार, गद्दार” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, शिवसेनेने जपलेले हिंदुत्व, विचारधारा आणि सातत्य यांना तिलांजली देत काही लोकांनी क्षणिक सत्तेच्या आणि पैशाच्या मोहापोटी पक्षाशी विश्वासघात केला. जनतेने दिलेला विश्वास, घेतलेल्या शपथा आणि शिवसेनेची विचारधारा यांना हरताळ फासत पक्षाला कमकुवत करण्याचे काम करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला.
“एक नव्हे तर तब्बल सहा खासदारांनी शिवसेनेला रामराम ठोकत जनतेच्या विश्वासाला तडा दिला आहे. त्यांनी केलेल्या या कृत्यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून अख्खा महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
देऊळगाव राजा–सिंदखेड राजा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निषेध आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी पक्षनिष्ठा आणि शिवसेना प्रमुखांच्या विचारांप्रती आपली बांधिलकी कायम असल्याचेही शिवसैनिकांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी तालुका प्रमुख दादाराव खराडे, गोविंदराव झोरे, वसंत कुळे, अजय शिवरकर,संभाजी शिंदे, शांताबाई सानप, नितेश देशमुख, राजीव नागरे, अविनाश डोईफोडे, सदाशिव मुख्याधल, सुनील खेडेकर, विठोबा पवार, संदीप शिंदे,विशाल उखळकर, गिरीश वाघमारे, विजय पारिक, अनिकेत भाग्यवंत, यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.



