चिखलीकरांवरील वाढीव गब्बरसिंग मालमत्ता कर वाढ तात्काळ रद्द करा.

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
जनतेच्या खिशावर डाका, चालणार नाही चालणार नाही!
अवास्तव कर वाढ मागे घ्या, नागरिकांना दिलासा द्या!
सेवा नाही, सुविधा नाही, मग कर वाढ कशासाठी?
महागाईने जनता त्रस्त, त्यात कर वाढ अन्यायकारक!
चिखलीकर एकजूट झाले, अन्यायाविरुद्ध रस्त्यावर येणार !
जनतेचा पैसा, जनतेच्या विकासासाठी वापरा!
वाढीव गब्बरसिंग कर वाढीचा निर्णय तात्काळ रद्द करा!
जनतेच्या आवाजाचा आदर करा!
चिखलीकरांच्या हक्कासाठी शिवसेना मैदानात!
1)मालमत्ता करात करण्यात आलेली वाढ तात्काळ मागे घ्यावी.
2)महागाईच्या काळात नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकू नये.
चिखली यांच्या अवा च्या सव्वा दरवाढीच समर्थन करायचं आहे त्यांनी मोबाईल कॅमेरा घेऊन सर्व चिखली ची विडिओ रेकॉर्डिंग करून ती सार्वजनिक करावी जेणेकरून चिखली शहरात. कचरा की कचऱ्यात, घाणीत चिखली शहर हे समजून जाईल.केवळ नगरपालिका आवारातील केबिन चा विकास झाला म्हणजे चिखली शहराचा विकास होत नाही
चिखली नगरपालिका मध्ये घरपट्टी, नळपट्टी भरून घेण्यासाठी कर्मचारी नाही म्हणून नगरपालिकेने tax स्वतः करदात्यांना पत्रक काढून आवाहन केलं की कर हा नगरपालिका मध्ये स्वतः येऊन भरावा. जर कर जमा करायला कर्मचारी नाही तर मग स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, इतर सुविधा कशा देतील याची माहिती जनतेला द्यावी
नगरपालिका 20 दिवसानंतर पाणीपुरवठा करते. घंटा गाडी येत नाही अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर, मनमानी घरासमोर रस्त्यात अतिक्रमण करतात, रात्रीला रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करून रस्ता अडवून ठेवतात, बाजारात ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना बसण्यास बाजारपेठेत जागा नाही केवळ हेळसांड होते, आणखी खूप समस्या आहेत त्या पुर्ण करणे गरजेचे आहे
त्यावर कारवाई करताना नगरपालिका मौन धारण करते tax जमा करताना विकास, स्वच्छता, रस्ते पाणीपुरवठा, दिवाबत्ती यासारख्या सुविधा साठी tax वाढविणे गरजेचे आहे असे समर्थन करते tax वाढवणे गरजेचे आहे तर समस्या निराकरण करणे नगरपालिका प्रशासन चिखली चे कर्तव्य आणि नागरिकांचा तो अधिकार
कर जर भरला नाही तर करावर वर्षाच्या सुरवातीपासूनच 2 % मासिक व्याज आकारणी केली जाते. म्हणजे वार्षिक 24% व्याज जे की जगातील कोणत्याही बँकेचे नाही. त्यावर देखील फेरविचार होणे अत्यावश्यक आहे.
“जनतेच्या हितासाठी, चिखलीकरांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि अवास्तव मालमत्ता कर वाढीच्या विरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरणार. जनतेवरील हा आर्थिक अन्याय थांबवावा.” अन्यथा शिवसेने च्या वतीने आंदोलन करण्यात येईल✍️



