मुलींच्या सुरक्षिततेसाठी देऊळगाव राजा पोलीस दलाचे दामिनी पथक सज्ज ,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :–. शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : दि.18जून)शहरात अनेक मुली बाहेर गावावरून शिकायला येतात स्पर्धा परीक्षेसाठी, नोकरीसाठी, क्लासेस साठी, देऊळगाव राजा शहरात उंच व चांगले शिक्षण प्रसिद्ध असल्यामुळे येथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी येतात त्या अनुषंगाने
देऊळगाव राजा शहरात.कुठेही मुलींची, महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेड काढणे, टवाळखोरी करणे, पाठलाग करणे किंवा त्रास देणे असे प्रकार घडत असतील तर त्वरित संपर्क करा. असे आव्हान
देऊळगाव राजा उपविभागीय पोलीस अधिकारी. मनीषा कदम मॅडम ,तसेच ठाणेदार ब्रह्मगिरी साहेब ,यांनी आवाहन केले
तक्रार मिळताच महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी संबंधित ठिकाणी येऊन त्वरित मदत व आवश्यक कारवाई करतील.
तसेच कदम मॅडम मार्गदर्शन बोलताना सांगितले की
मुलींची सुरक्षितता – आपली जबाबदारी आहे.
सुरक्षित समाजासाठी पुढे या
निर्भय बना , पुढे या पोलीस तुमच्या सोबत आहे
असे आवाहन उपविभागीय अधिकारी मनीषा कदम मॅडम तसेच
ठाणेदार ब्रह्मगिरी साहेब यांनी केले
महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शहरात ‘दामिनी पथक’ कार्यान्वित करण्यात आले असून, या
पथकाचा शुभारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम मॅडम यांच्या उपस्थितीत बसस्थानक चौकात करण्यात आला.
देऊळगाव राजा येथे अनेक कोचिंग क्लासेस, स्पर्धक परीक्षा केंद्र,माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालये कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम यांनी शहरासह विभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरक्षेचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार दामिनी पथके कार्यान्वित करण्यात येतील, असे सांगितले.
देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी साहेब यांनी दामिनी पथक २४ तास कार्यरत राहणार असून महिला सुरक्षेसाठी विशेष लक्ष देणार असल्याची माहिती दिली. या पथकात महिला पोलीस मीना बिलावेकर, महिला पोलीस मंगला बिथरे, वाहन चालक तसेच इतर कर्मचारी सहभागी असून शहरातील संवेदनशील ठिकाणे, तीर्थक्षेत्र मंदिर शैक्षणिक संस्था परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी नियमित गस्त घालण्यात येणार आहे.
या निर्णयाचा मनीषा कदम मॅडम व
ठाणेदार गिरी साहेब यांचा सर्वांतून
कौतुक होत आहे या पथकामुळे पालक वर्ग निश्चितपणाने मोकळाश्वास घेऊ शकतात असा विश्वास व्यक्त होत आहे,
“भीती नाही, सुरक्षिततेसाठी दामिनी पथक तुमच्या सोबत!”



