*दिव्यांग महायज्ञात ४५० व्यक्तींना ५२ लाखांचे साहित्य वाटप…..स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसप्रतिनिधी..

अनुराधा मिशनने माणसामध्येच देव शोधला : आ. धीरज लिंगाडे
चिखली : समाजात आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते की, निवडणुका आल्या किंवा इतर काही प्रसंग असला की लोक रुग्णांसाठी कॅम्प्स घेतात. विविध वस्तूंचे वाटप करतात जेणेकरून त्यांचे नाव होईल किंवा त्यांना निवडणुकीत उभे राहायचे असते. परंतु, असा कोणताही हेतू नसतानाही गत ३५ वर्षांपासून अनुराधा परिवार चिखली तालुका आणि परिसरात निस्वार्थी भावनेने रुग्णसेवेसाठी महायज्ञ आयोजित करत आहे. खऱ्या अर्थाने अनुराधा मिशनने माणसामध्ये देव शोधला असून लोकनेते राहुलभाऊ बोंद्रे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अमरावती पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी केले.
शनिवार ६ जून रोजी परमहंस रामकृष्ण मौनीबाबा संस्थान चिखली येथे अनुराधा मिशन व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम विभागीय कार्यालय मुंबई यांच्या वतीने दिव्यांग सेवा महायज्ञ आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते ४५० दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना ५२ लाखांचे ११ प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी आमदार धीरज लिंगाडे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, समाजात सर्वच लोक काही ना काही काम करत असतात. परंतु खऱ्या अर्थाने अनुराधा मिशनचे जे काम आहे, ही जी सेवा आहे, ती एका वेगळ्याच पातळीवरील सेवा आहे. यातून माणसाला जीवन जगत असताना एक वेगळेच समाधान मिळते. यापुढेही अशाच उमेदीने अनुराधा परिवार जनतेची सेवा करत राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. विष्णुभाऊ वैरागड यांनी दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना साहित्य कसे वापरावे, त्याचा दर्जा व गुणवत्ता याविषयी मार्गदर्शन केले. कॅम्पस डायरेक्टर डॉ. कैलास बियाणी यांनी ✍️



