रेशनिंग काळाबाजारी करणारे विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या हल्लाबोल

भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली प्रतिनिधी सलमान पठाण
चिखली शहरातील परिसरातील नागरिकांना अनेक वर्षापासुन रेशन वितरन सुरळीत होत नसल्याचे समजताच शहर प्रमुख आनंद गैची यांनी तहसिल कार्यालयवर धडक देत तहसीलदार साहेब यांना घेराव घालुन आदोलन करण्यात आले
चिखली शहरातील परिसरातील नागरिकांना अनेक वर्षापासुन रेशन वितरन सुरळीत होत नाही चिखली तील गरीब व अशीक्षीत नागरीकांची दर महीण्याला बायोमेट्रिक अंगठ्याचे ठसे घेतले जात असुन त्यांना सांगण्यात येते की रेशन साहीत्याचा तुटवडा आहे पुढच्या महीण्यात तुमचे रेशन मिळेल असे ३ ते ४ महीने ठसे घेऊन फक्त एक महीण्याचे रेशन देत असल्याचे तक्रारी वारंवार येत आहे दरम्यान चिखली शहरातील जवळपास सर्व रेशन दुकानदार अधिकारी ठेकेदार व काही काळा बाजार करणारे व्यापारीवर्ग आणि ट्रांन्सपोर्ट करणारी कंपनी तसेच काही खाघ पदार्थ बनवणारे कंपन्या रात्रीस खेल चाले इतका मोठा सामुहिक भ्रष्टाचार मध्ये सामील असल्याचे कळते हा सामूहिक भ्रष्टाचार इतका मोठा व खुला आहे की हे सर्व यांना माहिती असुन सुध्दा मूग गिळुन गप्प आहेत प्रत्येक दुकानातुन माल महीण्याभरा तुन विकला जात असल्याचे दिसुन येत आहे या निमित्ताने शहर प्रमुख आनंद गैची व पदाधिकारी यानी तहसीलदार साहेब यांना घेराव घालुन चर्चाअंती आदोलन हे काही सुचना व मागण्या करत निवेदन घेवुन स्थगित करण्यात आले आहे ज्यामध्ये वारंवार तक्रारी येतात त्यांच्या रेशन दुकनांच्या मान्यता रद्द करणे रेशनिंग कार्ड धारकांना प्रति माह प्रति व्यक्ति प्रति किती किलो रेशनिंग मिळणे अनिवार्य आहे याची जनजागृति व्हिडिओ आदी काढुन प्रसिद्धि करणे संपूर्ण रेशन गाडी मधुन शिधा वाटप दुकानात जातात का याची खात्री करणे व ती वेळेवर व शासनाने दिलेल्या प्रमाणात वितरित होते का याची खात्री करणे शहरातील नागरिकांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक तक्रार ई मेल फोन नंबर आदी सुविधा देणे आठवड्याची सिट्टी वगळता दुकान ८ तास उघडणे बंधनकारक करावे सकाळी ४ तास सायंकाळी ४ तास यावर अमलबजावणी करणे गरजेचे आहे कारण दुकानदार नेहमीच दुकान बंद ठवतात त्यामुळे अनेक नगरिकांचे हक्काचे रेशन डुबत आहे तर तक्रार पुस्तक दुकानाच्या दर्शनी भागास लावणे आणि बायोमेट्रिक अंगठा लावल्यानंतर पावती देणे बंधनकारक करणे अशी यावेळी सुचना करण्यात आली प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास आज आम्ही निवेदन देतोय जर रेशनिंग चोरी बंद नाही झाली तर न भुतो न भविष्यत असा शिवसेना स्टाईलने आदोलन करण्यात येईल असा इशारा शहर प्रमुख आनंद गैची यानी दिला. यावेळी युवासेना शहर प्रमुख आनंद गैची, उपशहरप्रमुख सर्वश्री समाधान जाधव, रवी पेटकर, शंभु गाडेकर, अनिल जावरे, गणेश कुडके, सचिन जोशी,सोहेल शाहा, दीपक सोलाट, होमेश मेहता, इमरान शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



