खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

जळगाव येथे काँग्रेसचे आंदोलन; मुक्ताईनगर तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवार, दिनांक 29 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजता जळगाव येथे विविध जनहिताच्या प्रश्नांवर आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात मुक्ताईनगर तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, विविध सेलचे तालुकाप्रमुख, कार्यकर्ते, शेतकरी, कामगार तसेच बेरोजगार युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष कृषिरत्न दिनेश पाटील यांनी सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकजूट दाखवत आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. तसेच शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांनीही नागरिकांनी उपस्थित राहून आंदोलनाला बळ द्यावे, असे म्हटले आहे.

राज्यातील विविध प्रश्नांबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन महत्त्वाचे असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आंदोलनात मुक्ताईनगर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button