न.प.तेल्हारा कडुन स्मशानभूमीतील हिंदू देवांच्या मूर्तीची दूरुस्ती

न.प.तेल्हारा कडुन स्मशानभूमीतील हिंदू देवांच्या मूर्तीची दूरुस्ती
स्टार भारत
लाईव्ह एक्सप्रेस
ता.प्रतिनिधी विजय घोडे
तेल्हारा. शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण वैष्णव यांच्या निवेदन ची परिषद तेल्हारा हद्दीतील स्मशानभूमीत हिंदू धर्माच्या देवांच्या मूर्ती लावलेल्या आहेत. स्मशानभूमीतील हिंदू धर्माच्या मूर्ती खंडित झाल्या आहेत. यामुळे हिंदू धर्माच्या व शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. स्मशानभूमीत सौंदर्य करण्याच्या दृष्टीने लाखो रुपये खर्च करून आवारभिंतीचे काम केले आहे यामधील पाणी फवारे पूर्णपणे बंद आहेत. लॉन अस्तित्वात नाही. आवारभिंतीला तळे गेलेले आहेत.
देवांच्या मूर्तीचे व स्मशानभूमीतील सौंदर्यीकरण लवकरात लवकर करण्यात यावे, अन्यथा आम्ही
निवेदनकर्ते आंदोलन छेडणार व याची सर्वस्व जबाबदारी स्थानिक प्रशासनाची राहील, असे निवेदन काही दिवसांपूर्वी शिवसेना तालुका प्रमुख प्रवीण वैष्णव, भा.ज.यु. मोर्चाचे अतुल विखे, सुनील राठोड, प्रदीप शिवा खाडे, रुषभ ठाकूर, यश अवचार, रोहित धामोळे, आकाश म्हसाळ, अमोल सोनोने, अमोल फोकमारे, वैभव फोकमारे, अभिषेक इंगळे, मनसेचे प्रदीप राजुस्कर यांच्यासह शिवभक्त यांनी तेल्हारा नगर परिषद मुख्याधिकारी सतिश गावंडे यांना देण्यात आले होते या निवेदन ची दखल घेत मुख्याधीकारी यांनी निवेदन कर्तेची भावना समजून स्मशानभूमीतील हिंदू देवी देवतांची मुर्ती ची रीपेरींग करण्यात आले आहे मुख्याधिकारी सतिश गावंडे यांच्या या तातडीने घेतलेल्या निर्णयांचे तेल्हारा शहरातील नागरिक कैतुक करत आहे
व निवेदन कर्ते समाधान व्यक्त करत आहेत



