मलकापूर विधानसभा क्षेत्रांतर्गत नांदुरा तालुक्यातील फुली या गावात बसपाची पहिली शाखा ओपन ,जल्लोषात लावले फलक बसपा पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण.!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी रतन भगत.
नांदुरा (फुली):-दि.२७/५/२६ सविस्तर वृत्त असे की काल दिनांक २६/५/२६ रोजी फुली तालुका नांदुरा येथे माननीय प्रदेश कार्यकारणे तथा जिल्हा कार्यकारणी यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात गावची ते शाखा ओपनिंग करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने दिनांक २६/५/२०२६ रोजी मलकापूर विधानसभा क्षेत्रा अंतर्गत पुली या गावात बसपाची पहिली शाखा ओपन करण्यात आली. माननीय साहेब कांशीरामजी म्हणायचे इरादा आगार लेख हो तो रास्ते खुद ही खुद निकल आते है वरना बहाने ही बहाने है. सदर या कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक प्रदेश सचिव माननीय पंडित जी बोर्डे साहेब हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. तसेच जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष माननीय दिलीप जी सरकटे साहेब यांचे प्रमुख उपस्थिती होती. मलकापूर विधानसभा इनचार्ज माननीय श्रीकांतजी वानखडे साहेब यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले विशेष व महत्त्वपूर्ण बाब म्हणजे खामगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष माननीय रवींद्र वाकोडे साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून त्यांची उपस्थिती लाभली होती. फुली या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच साहेब प्रकाशजी सातव हे सुद्धा या कार्यक्रमाला जातीने हजर होते. या कार्यक्रमासाठी गावातील असंख्य बसपा कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी मलकापूर विधानसभा क्षेत्र महासचिव प्रशांत इंगळे साहेब यांनी गेली आठ-दहा दिवस स्वतःला झोकून दिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मलकापूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष माननीय रवींद्र साठे साहेब आणि त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी खूप मोलाची आणि कौतुकास्पद अशी कामगिरी केली. या कार्यक्रमाला धीरज जी वानखडे फुल येथील जुन्या कार्यकर्ते समाधानी इंगळे साहेब माणिक जी इंगळे साहेब, तुळशीरामजी इंगळे साहेब, दिवाकर इंगळे साहेब, राहुल जी रणीत साहेब, फुल येथील बसपा कार्यकर्ते हे तीन दिवस आधीपासूनच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामाला लागले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रदेश सचिव माननीय पंडित जी बोर्डे साहेब व जिल्हाध्यक्ष दिलीप जी सरकटे साहेब यांचे फुले या गावात कार्यक्रमास्थळी आगमन होताच क्षणी यांचा गगनभेदी आवाज व फटाक्यांच्या आतिश बाजीने संपूर्ण फुली परिसर हा दणाणून गेला होता. मान्यवर कांशीरामजी साहेब यांच्या काळातील जुन्या नारबाजी करून जुन्या आठवणी परत एकदा जागा झाल्या होत्या. मान्यवरांच्या हस्ते बसपा ची पहिली शाखा ओपन करून वाजत गाजत गावातून रॅली काढून नंतर रॅलीचे रूपांतर फार मोठ्या सभेमध्ये झाले. या कार्यक्रमासाठी मलकापूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शिवश्री रविंद्र साठे बेलाड यांच्या या कामासाठी प्रदेशाध्यक्ष सचिव माननीय पंडित जी बोर्डे साहेब व जिल्हाध्यक्ष दिलीप सरकटे साहेब यांनी भरभरून असे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बसपाचे जिल्हा नेते डॉक्टर जि.ओ .जाधव साहेब यांचे मोलाचे असे आर्थिक सहकार्य लाभले.



