गांजा तस्कर जळगाव जामोद पोलिसांच्या जाळ्यात, दोन किलो तीनशे ग्रॅम गांजा, मोटर सायकल वाहन व मोबाईल सह आरोपी पोलिसांच्या ताब्यात.!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस, संग्रामपुर तालुका प्रतिनिधी रतन भगत.
जळगाव (जामोद )दि.२६/५/२६, सविस्तर वृत्त शेती जळगाव जामोद पोलिसांनी मिशन परिवर्तन अंतर्गत फार मोठ्या प्रमाणाची धडक कारवाई करत अवैध अगदी पदार्थाची तस्करी करणाऱ्या आरोपीला रंगेहात पकडून तब्बल २ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या जळगाव जामोद पोलिसांच्या धडक अशा कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली असून जळगाव जामोद पोलिसांच्या धाडसी कर्तुत्वाचं सर्वत्र अ कौतुक होत आहे.
दि.२६/५/२६ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील खेरडा रोड वरील पाटण मार्केट परिसरात पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाकाबंदी सुरू होती. यावेळी गुप्त बातमीदारांमार्फत मोटरसायकल सवार एका इसमाकडे मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयित वाहन क्रमांक एम एच ३०BQ०२४५ ही मोटरसायकल थांबून तपासणी केली असता वाहनाच्या डिक्केतील एका पिशवीमध्ये दोन किलो तीनशे ग्रॅम गांजा आढळून आला. या गांजाची किंमत अंदाजे एक लाख ,१८ हजार ,पाचशे रुपये असल्याचे सांगण्यात आले. जळगाव जामोद पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल गांजा दोन किलो तीनशे ग्रॅम किंमत अंदाजे एक लाख 18 हजार पाचशे रुपये, बजाज प्लेटिना मोटर सायकल अंदाजे किंमत 72 हजार रुपये, रेडमी मोबाईल अंदाजे किंमत बारा हजार रुपये एकूण मुद्देमाल दोन लाख २ हजार ५०० रुपये एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी उत्तम शहादेव तायडे वय वर्ष 55 राहणार दानापुर तालुका तेल्हारा जिल्हा अकोला येथील असून त्याचे वर जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे अप क्रमांक ३३८/२०२६ कलम ८(क) २०(ब) एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.



