खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरराजकीयसामाजिक

चांगदेव पंचक्रोशीत वीज समस्यांवरून संताप; शिवसेनेचा उपोषणाचा इशारा

मुक्ताईनगर प्रतिनिधी : –

चांगदेव पंचक्रोशीतील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या वीज समस्यांचे कायमस्वरूपी निवारण करण्यात महावितरण प्रशासन अपयशी ठरत असून संबंधित अधिकारी कर्तव्यात कसूर करीत असल्याचा आरोप करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. तसेच दोन दिवसांत समस्या न सोडवल्यास दि. २८ मे रोजी महावितरण कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनात चांगदेव, चिंचोल, मेहून, वढवे, कासारखेडा व मानेगाव परिसरातील शेती शिवार व गावठाण भागात अनेक दिवसांपासून वीज समस्या कायम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. डीपी बदलणे, नवीन डीपी बसविणे, वीज पोल बदलणे, तार ओढणे आदी कामांसाठी वारंवार तोंडी व लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
समस्या मांडल्यानंतर संबंधित ठेकेदारांशी संपर्क साधण्याचे उत्तर दिले जाते. तसेच काही ठेकेदार व कर्मचारी ‘चिरीमिरी’ची भाषा वापरत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असून प्रशासनाविषयी नाराजी वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
याप्रकरणी पुढील दोन दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास दि. २८ मे २०२६ रोजी गुरुवारी शिवसेना पक्षाच्या वतीने व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत महावितरण कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना शिवसेना उपजिल्हा संघटक पंकज कोळी, नीलेश शीरसाठ, गणेश टोगे, राजेंद्र वानखेडे, अक्षय चौधरी, सूपडू बोदडे, रतीराम शीरसोदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button