चिखलीत स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली… प्रतिनिधी
महावितरण हे सोलार उद्योगपतींच्या दावणीला : राहुलभाऊ बोंद्रे
चिखली : भाजप सरकार हे भांडवलशाही धोरण राबवून महावितरणमध्ये गोरगरीब, शेतकरी, कष्टकऱ्यांचे नुकसान होईल अशा पद्धतीने व्यूहनिती आखत आहे. महावितरणचा कारभार अत्यंत भ्रष्ट झाला आहे. आधीच विजेचे दर सातत्याने वाढत आहेत. ग्राहकांना बिल का वाढत आहे, हेच समजत नाही. त्यात आता स्मार्ट मीटर लावून लोकांच्या बिलात दुप्पट-तिप्पट वाढ होत आहे. अनेक ठिकाणी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवले जात आहेत आणि त्यानंतर ग्राहकांना भरमसाट बिले येऊ लागली. सरळ सरळ सोलार कंपन्यांच्या फायद्यासाठी हे धोरण राबवले जात आहे. लोकांनी महावितरणचे मीटर काढून टाकून घरावर सोलार बसवावे, यासाठीच हा सगळा प्रकार सुरू आहे. मात्र पुढे सोलारधारकांनाही फटका बसणार आहे. सरकारचे धोरण हे केवळ भांडवलदारांना पोसणारे आहे. एकंदरीत महावितरण हे सोलार उद्योगपतींच्या दावणीला बांधले गेल्याचा घणाघात माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केला.
सोमवार २५ मे रोजी शहर काँग्रेसने स्मार्ट मीटर सक्तीविरोधात चिखलीत जोरदार आंदोलन छेडले. महावितरणच्या उपविभागीय कार्यालयासमोर झालेल्या या आक्रमक आंदोलनात माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी भाजप सरकारवर आणि महावितरणच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांवर लादला जाणारा आर्थिक भुर्दंड, वाढीव व अवाजवी वीज बिले आणि ग्राहकांच्या संमतीशिवाय सुरू असलेल्या कारभाराविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महावितरण प्रशासनाला निवदेन देवून ग्राहकांच्या परवानगीशिवाय ✍️



