बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

देशावर नाही, तर थेट शेतकऱ्यांवर संकट”; डिझेल टंचाईवर शेतकरी नेत्याचा सरकारला इशारा“डिझेल द्या, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरेल”

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसप्रतिनिधी सलमान पठाण चिखली

विनायक सरनाईक यांचा आंदोलनाचा इशारा
बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून शेती मशागतीची कामे पूर्णपणे विस्कळीत झाली आहेत. पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या तब्बल 10 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटना चे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
“नेते म्हणत आहेत की देशावर संकट आहे, मात्र प्रत्यक्षात हे संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे,” असे सांगत सरनाईक यांनी सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची महत्त्वाची वेळ असताना डिझेल अभावी ट्रॅक्टर, मशागतीची यंत्रे आणि शेतीची कामे ठप्प पडली असल्याचे त्यांनी म्हटले. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर रात्रीपासूनच शेतकरी रांगेत उभे राहत असून डिझेल मिळवण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना सुरळीत डिझेल पुरवठा करावा, अन्यथा राज्यभरातील
शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देखील विनायक सरनाईक यांनी दिला.
“उद्याच्या काळात निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सरकारच जबाबदार राहील,असेही त्यांनी स्पष्ट केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button