खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

इंधन तुटवड्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस चिखली प्रतिनिधी सलमान पठाण सवणा

बुलढाणा : सध्या देशभर पेट्रोल-डिझेल तुटवड्यामुळे नागरिकांसह शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा अपुरा पुरवठा होत असल्याने नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. तसेच शेती मशागती व पेरणीच्या महत्त्वाच्या काळात डिझेलअभावी शेतकऱ्यांची कामे खोळंबत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर समस्येवर शासनाने तातडीने उपाययोजना करून पेट्रोल-डिझेलचा सुरळीत पुरवठा करावा, या मागणीसाठी मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख लखनभाऊ गाडेकर, युवासेना जिल्हाप्रमुख नंदुभाऊ कऱ्हाडे, जिल्हासंघटक सुमीतभाऊ सरदार, बुलढाणा तालुकाप्रमुख विजयभाऊ इतवारे, मोताळा तालुकाप्रमुख विजयभाऊ इंगळे, युवासेना तालुकाप्रमुख मोहितभाऊ राजपूत, युवासेना शहरप्रमुख अनिकेतभाऊ गवळी, कामगार सेना उपतालुका प्रमुख शेख रफिकभाई, केळवद शाखाप्रमुख अशोकभाऊ मोहिते, निर्मलभाऊ इंगळे, मो. मुजफ्फरभाई, श्रीकांतभाऊ जाधव, अमोलभाऊ बेंडे, नारायणभाऊ वाणी, अक्षयभाऊ जवरे, बबलुभाऊ इंगळे, सुनंदाताई खरात, अनिताताई जाधव, वर्षाताई खरात, अनिताताई गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button