समता हाच वारकरी संप्रदायाचा पाया. श्री. अमोल मिटकरी

हिवरखेड प्रतिनिधी
समता हाच वारकरी संप्रदायाचा पाया. श्री. अमोल मिटकरी .
महाराष्ट्र ही संत भूमी असून, त्याच्या जडनघडनीत वारकरी संप्रदायीक संत परंपरेचे फार मोठे योगदान आहे. कारण त्यांनी आपल्या शुद्धाचरणातून समाजाचे प्रबोधनासह परिवर्तन केले. आज मात्र उत्तर हिंदुस्तानीय प्रबोधनकाराचे लोंढे महाराष्ट्रात येऊन धर्माच्या नावाखाली धर्मावरच आक्रमण आणि अतिक्रमण करीत आहेत. ते समर्थपणे परतविण्यासाठीच संतश्री वासुदेवजी महाराजांनी बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून या जातीय विषमतेला पूर्णतः मूठमाती देऊन, समानतेचा पुरस्कार करणारी संस्कारक्षम सेना निर्माण करण्याचे कार्य केले. कारण वारकरी संप्रदाय हा समतेच्या भरभक्कम पायावर उभारलेला आहे असे निष्ठापूर्वक मत मा.आ. अमोलजी मिटकरी यांनी मांडले. ते आज श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ च्या वतीने आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मुंगी आणि राव l आम्हा समान जीव ll तुकाराम महाराजांचे उद्गार हेच समानतेचे ज्वलंत उदाहरण आहे. यावेळी शिबिर संचालक भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी प्रास्ताविकासह विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक कार्यक्रम सादर करीतांना सांगितले की, बाल संस्कार ही कृतज्ञतेची जननी असून, माननीय मिटकरी साहेबांनी त्या बालसंस्कार शिबिरार्थींच्या निवासकरिता वीस लक्ष रुपयाचा भरघोस निधी देऊन दिलेले आश्वासन पूर्ण केल्याबद्दल महाराजांसह विद्यार्थ्यांनी त्यांना धन्यवाद दिले. यावेळी अकोला महानगरपालिकेचे नगरसेवक आशिषजी पवित्रकार सहपरिवार तसेच श्रीयुत तुलसीदाजी खिरोळकर आदि गणमान्य मंडळी उपस्थित होती. असे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.आज बालसंस्कार शिबिराचा समारोप. संतश्री वासुदेवजी महाराज यांच्या कृपेने गत विस वर्षापासून संपन्न होत असणाऱ्या श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिराचा २१.५.२०२६ ला गुरुपुष्यामृताच्या पर्वकाळावर सायंकाळी सहा ते दहा या वेळेत अनेक क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिकासह प्रशस्तीपत्र इतरांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.



