नीट पेपर लीक प्रकरणात दोषिंना कडक शिक्षा व्हावी!!! बसपा जिल्हाध्यक्ष दिलीपजी सरकटे साहेब!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी, रतन भगत.
(बुलढाणा) दि .२०/५/२६ सविस्तर वृत्त असे की, नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक झाली आहे आणि सदर परीक्षा परत घेतली जाणार आहे. बहुजन समाजातील विद्यार्थी रात्रंदिवस आपल्या जीवाचं रान करून अभ्यास करतात .पालक सुद्धा आपल्या हाडाची काड करून मुलांना शिकवण्याचा आटोकाठ प्रयत्न करतात. त्यातून भविष्य निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात .परंतु शासन आणि प्रशासनाच्या ढिसाळ अशा कारभारामुळे अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी नीट ची प्रश्नपत्रिका जर लिक होत असेल तर ही बाब अत्यंत लज्जास्पद आणि देशद्रोही गुन्हा आहे. सदर नीट पेपर लीग प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मार्फत सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी पदाधिकाऱ्यांना कठोरात कठोर अशा प्रकारची शिक्षा व्हावी आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार मुळासगट उखडून टाकावा आणि जबाबदारांना फास्ट कोर्टामार्फत फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच दुबार होणाऱ्या नीट परीक्षा त्यांच्या येण्या जाण्याचा आणि त्यांच्या भाड्याची आणि वेळप्रसंगी निवासाची व्यवस्था शासनाने मोफत करावी याकरिता बहुजन समाज पार्टी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. माननीय खासदार इंजिनियर रामजी गौतम साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष एडवोकेट सुनील जी डोंगरे साहेब यांचे मार्गदर्शन तथा सूचनेनुसार आज दिनांक १८/५/२०२६ रोजी संबंधितांवर व दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी यांचे मार्फत माननीय राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी बुलढाणा जिल्हाध्यक्ष दिलीप जी सरकटे मलकापूर विधानसभा अध्यक्ष रवींद्र साठे, बुलढाणा विधानसभा अध्यक्ष रंजनाताई सपकाळ, कॅप्टन कैलास खिल्लारे ,मलकापूर विधानसभा महासचिव प्रशांत इंगळे, बुलढाणा विधानसभा महासचिव सविताताई इंगळे, मायाताई मिसाळ आणि बुलढाणा विधानसभा कोषाध्यक्ष उमेश मेंढे सह इतर कार्यकर्ते पदाधिकारी निवेदन देते वेळी उपस्थित होते.
✍️



