बुलढाणामहाराष्ट्रसामाजिक

खा .मुकुल वासनिक आज चिखलीत! कर्मयोगी स्व: तात्यासाहेब बोंद्रे यांच्या भव्य प्रेरणास्थळाचे होणार

खा .मुकुल वासनिक आज चिखलीत! कर्मयोगी स्व: तात्यासाहेब बोंद्रे यांच्या भव्य प्रेरणास्थळाचे होणार भूमिपूजन! महाआरोग्य शिबिराचेही आयोजनस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसजिल्हा प्रतिनिधीउषा इंगळे बुलढाणा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, तथा विद्यमान राज्यसभा खासदार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक आज चिखलीत येत आहेत. त्यांच्या हस्ते कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या भव्य प्रेरणास्थळाचे भूमिपूजन होणार आहे. मुंबई येथील प्रख्यात वास्तु विशारद संजय पुरी यांनी या प्रेरणास्थळाचे डिझाईन केले आहे.चिखली परिसरातील विकास मध्य शैक्षणिक क्षेत्रासह, सहकारात मोलाची भर घालणाऱ्या कर्मयोगीस्व तात्यासाहेब बोंद्रे यांची आज, 12 सप्टेंबर रोजी जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांच्या भव्य प्रेरणास्त्राची भूमिपूजन खा. मुकुल वासनिक यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रख्यात नेत्ररोग तज्ञ वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक पद्य श्री डॉ तात्याराव लहाने यांनी प्रमुख उपस्थिती होणार आहे. चिखलीत अनुराधा नगरातील तपोभूमी परिसरात जिथे कर्मयोगी तात्या साहेबांनी आयुष्यातील शेवटची 22 वर्षे वानप्रस्थाश्रमात व्यतीत केली त्या कणकोटी या निवासस्थानाच्या बाजूलाच प्रेरणा स्थळ या भव्य स्मारकाची निर्मिती अनुराधा परिवाराच्यावतीने करण्यात येणार आहे. आज होणारा भूमिपूजन सोहळ्याला जिल्हाभरातील सर्वपक्षीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. भूमिपूजन सोहळा व महाआरोग्य शिबिराला जास्तीत जास्त नागरिकांची उपस्थिती राहावी, गरजू रुग्णांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी अनुराधा परिवाराच्यावतीने केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button