आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हा अधिकाऱ्याचे आवाहन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- सागर रावणचोरे
चंद्रपूर ( दि 20 मे ):-वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक 18 जून 2026 रोजी होणार आहे यासाठी तीनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्य सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदाराचा समावेश आहे. तीनही जिल्ह्यात 18 मे पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूर जिल्हा अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
जिल्हा अधिकारी कार्यालयात विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडनुकीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार उपस्थित होते.
सदर निवडणुकीकरिता चंद्रपूर महानगरपालिकेचे 66 सदस्य तसेच जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा आणि 7 नगरपंचायतीचे एकूण 403 असे चंद्रपूर जिल्ह्यातील 469 मतदार, गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगरपरिषदा आणि 9 नगरपंचायतीचे एकूण 244 मतदार तर वर्धा जिल्ह्यातील9 नगरपंचायतीचे एकूण 244 मतदार तर वर्धा जिल्ह्यातील 10 नगर परिषदांचे एकूण264 मतदार आहेत.
तर चंद्रपूर गडचिरोली वर्धा येथील जिल्हा परिषद संख्या कमी आहे



